आळिंबीपासून प्रथिन निर्मिती  
कृषी पूरक

अळिंबी प्रथिनांतून पदार्थाच्या पोषकतेत वाढ

कोजेन्सिस वृत्तसेवा

आहारातील पोषकता वाढवण्यासाठी वनस्पतिजन्य (विशेषतः अळिंबीपासून) प्रथिनांच्या निर्मितीसाठी विविध कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून प्रतिवर्ष चार हजार टन इतके उच्च दर्जाचे प्रथिन उत्पादन घेण्याचे नियोजन केले जात आहे. सध्या क्विण्वन प्रक्रियेद्वारे विविध प्रकारची प्रथिने मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्याला किंचित वेगळी चव लागते. त्यामुळे अशा प्रथिनांना ग्राहकांकडून कमी प्रमाणात मागणी असते. यावर मात करण्यासाठी नैसर्गिकरीत्या मिळवलेल्या अळिंबीपासून स्प्रे ड्राईंग पद्धतीने निर्जलीकरण केलेली भुकटी तयार करण्यात येते. त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण कोरड्या स्थितीमध्ये ७७ ते ८० टक्के असते. ही अळिंबी वाटाणा किंवा भातातील प्रथिनांवर वाढवलेली असते. वनस्पती आधारित प्रथिने

  • प्युअर टेस्ट हा अमेरिकेतील क्विण्वन केलेल्या भाजीपाला प्रथिनांचा ब्रॅण्ड आहे. त्यामध्ये वनस्पती आधारित प्रथिने तयार केली जातात.
  • योग्य प्रमाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण झाल्यानंतर (सुमारे ४८ तासांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते.) अळिंबीची काढणी केली जाते. त्या नंतर ती वाळवून अत्यंत बारीक अशी भुकटी केली जाते. त्यात कॅलरी, मेद, कर्बोदके यांचे प्रमाण कमी असून, त्यात अन्य कोणत्याही घटकांपेक्षा जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते.
  • विविध प्रकारच्या टॉर्टिलामध्ये (मेक्सिकन मक्याच्या चपातीला टॉर्टिला म्हणतात.) मिसळण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो.
  • पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तसेच क्रॅकिंग होणे कमी होते. मांसाचे पदार्थ, सॅलड, ड्रेसिंग, तृणधान्ये, प्रथिने बार आणि तयार पेय यामध्ये याचा वापर करता येतो.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Weather Today: पूर्व विदर्भात पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम

    Farmer Drought Relief: दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत मिळणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

    Fodder Restrictions: चारा टंचाई टाळण्यासाठी वाशीममध्ये सोयाबीन, तूर कुटार विक्रीवर निर्बंध

    Turmeric Crop Condition: वाशीममध्ये हळद पीक संकटात; कंदांची वाढ खुंटल्याने उत्पादन घटण्याची भीती

    Ethanol Fuel: ई पंच्याऐंशी आणि ई शंभर इंधनावरील वाहनांना केंद्राची परवानगी; मोटार वाहन नियमांत सुधारणा

    SCROLL FOR NEXT