Lumpy Vaccination Agrowon
कृषी पूरक

Lumpy Vaccination : लसीकरण झालेल्या जनावरांनाच प्रवेश

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची माहिती

टीम ॲग्रोवन

सांगली : गाय व म्हैस वर्ग पशुधनातील (Livestock) लम्पी स्कीन (Lumpy Skin) रोगावर नियंत्रण राखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या ऊस तोड मजुरांसोबत असणाऱ्या जनावरांचे लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination certificate) असणे आवश्यक आहे.

ज्या जनावरांचे लसीकरण केले नाही, अशी जनावरे सांगली जिल्ह्यात व जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या आवारामध्ये प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. याबाबत सर्व साखर कारखान्यांनी खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, की यंदाचा गाळप हंगाम सुरू होत आहे. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व ऊस तोड मजुरांची यादी सर्व साखर कारखान्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सांगली, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी

यांच्या कार्यालयाकडे प्राधान्याने तत्काळ सादर करावी. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आवारात आलेल्या जनावरांमध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तालुक्याचे पशुसंवर्धन अधिकारी, पशू पर्यवेक्षक यांनी जनावरांची तपासणी करून लम्पी स्कीन रोगाच्या प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT