Goat Farming Agrowon
ॲनिमल केअर

शेतकरी नियोजन ः शेळीपालन

मी २०१४ पासून शेळीपालन (Goat Farming) व्यवसाय करीत आहे. सध्या माझ्याकडे ७० शेळ्या व त्यांची २५ पिल्ले आहेत. त्यात प्रामुख्याने उस्मानाबादी व बिरारी या दोन जातीच्या शेळ्या आहेत.

टीम ॲग्रोवन 

नाव ः गणेश जगन्नाथ काळे,

गाव ः तामशी, ता. बाळापूर, जि. अकोला

एकूण शेळ्या ः ७०

मी २०१४ पासून शेळीपालन व्यवसाय करीत आहे. सध्या माझ्याकडे ७० शेळ्या व त्यांची २५ पिल्ले आहेत. त्यात प्रामुख्याने उस्मानाबादी (Osmanabadi Goat)व बिरारी (Berari Goat) या दोन जातीच्या शेळ्या आहेत. या शेळ्यांचे पिल्ले जन्माला घालण्याचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. या शेळ्या काटक असून वातावरणाला पूरक आहेत. योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते, असा माझा अनुभव आहे. सध्या तापमानात वाढ होत असल्याने शेळ्यांची विशेष काळजी घेतली जाते. उन्हापासून संरक्षणासाठी सावली व थंडाव्यासाठी ग्रीन नेट बांधली आहे.

चारा नियोजन ः

  • - दोन एकरावर दशरथ, ल्सूसर्न, आफ्रिकन टॉल मका या चारा पिकांची लागवड केली आहे.

  • - दररोज सकाळी सात वाजता शेळ्यांना पशूखाद्य दिले जाते. त्यानंतर सकाळी ९ आणि दुपारी २ वाजता लुसलुशीत हिरवा चारा चॉप कटरने बारीक करून शेळ्यांना दिला जातो. मोठ्या शेळीला प्रत्येकी ३ किलो तर लहान पिल्लांना १ किलो हिरवा चारा दिला जातो.

  • - सायंकाळी सात वाजता तुरीचे कुटार प्रत्येकी एक किलो या प्रमाणात दिले जाते.

लसीकरणाचे नियोजन ः

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शेळ्यांना व पिल्लांना नियमित लसीकरण (Goat Vaccination) केले जाते. एप्रिल महिन्यात गोठ्यातील सर्व शेळ्यांना इटीचे लसीकरण करण्याचे नियोजन असते. त्यानुसार लस देण्याच्या १० दिवस आधी सर्व शेळ्यांना जंताचे औषध दिले. त्यानंतर पुढील १० दिवस दररोज लिव्हर टॉनिक आणि मल्टी व्हिटॅमिन देऊन नंतरच इटीचे लसीकरण केले. शेळ्यांवर लसीकरणामुळे येणारा ताण लिव्हर टॉनिक आणि मल्टी व्हिटॅमिनमुळे कमी होण्यास मदत होते. लसीकरण केल्यानंतर १४ दिवसांनी इटीचा बूस्टर डोस दिला. बूस्टर डोस दिल्यानंतरही पुन्हा १० दिवस लिव्हर टॉनिक आणि मल्टी व्हिटॅमिन दिले जाते.

आगामी नियोजन ः

  • - वाढत्या तापमानामुळे शेळ्यांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण वाढते. यासाठी दुपारच्या वेळेत शेळ्यांना ग्लुकोज व लिंबू पाणी दिले जाते. तसेच पिण्यासाठी थंड पाण्याची उपलब्धता केली जाते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये येणारा थकवा निघून जाण्यास जाण्यास मदत होते.

  • - पाण्याच्या भांड्यांना चुना, ब्लिचिंग पावडर लावली जाते. जेणेकरून भांड्यांना शेवाळ लागणार नाही आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होईल.

  • - पावसाळा सुरु होण्यापूर्वी मुरघास तयार करून ठेवला जाईल. मुरघास तयार करण्यासाठी लसूण घास, आफ्रिकन टॉल मका या हिरव्या चाऱ्याचा वापर होतो.

  • - शेळ्यांचे शेड वेळोवेळी स्वच्छ धुवून घेतले जाईल. कारण, मूत्र आणि लेंढीचा घाण वास येऊन शेळ्या आजारी पडण्याची शक्यता असते.

  • - शेळ्या वर्षभरात साधारण जानेवारीच्या शेवटी आणि मे महिन्याच्या शेवटी धुतल्या जातात. शेळ्यांना स्वच्छ धुतल्यामुळे शरीरावरील घाण, केसांमधील कोंडा निघून जाण्यास मदत होते.

  • - पावसाळा सुरु होण्यापूर्वी गोठ्यातील अशक्त शेळ्या व पिल्लांची विक्री केली जाईल. जेणेकरून गोठ्यामध्ये त्यांची मरतूक होणार नाही.

विक्री नियोजन ः

  • - गोठ्यातील पिल्ले ५ ते ६ महिन्यांची झाल्यानंतर त्यांची विक्री केली जाते. मादीची विक्री ३१० रुपये प्रतिकिलो आणि नराची ३८० रुपये दराने केली जाते.

  • - बोकड साधारण १ ते २ वर्षांचे झाल्यानंतर विकले जाते.

- गणेश काळे, ९५२७१५६७४७

(शब्दांकन ः गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease Vaccination: लम्पी प्रतिबंधासाठी ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप

Banana Price: बऱ्हाणपूर येथे केळीला कमाल २८०० रुपये दर

Ashwagandha Farmers Crisis: अश्वगंधावरील निर्बंधांमुळे शेतकरी अडचणीत

Rural Economy: सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत : मोहोळ

Modern Education: विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासह पायाभूत सुविधा देणे गरजेचे; उपमुख्यमंत्री पवार

SCROLL FOR NEXT