Why is calcium important in animal diet? Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Feed : पशु आहारात कॅल्शिअम का आहे गरजेचे?

पशुआहारात कॅल्शिअम दूध उत्पादन व हाडांची व दातांची उत्तम वाढ होण्यासाठी मदत करतात, रक्त गोठवण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते.

Team Agrowon

पशुआहारात (Animal Feed) कॅल्शिअम (Calcium) दूध उत्पादन (Milk Production ) व हाडांची व दातांची उत्तम वाढ होण्यासाठी मदत करतात, रक्त गोठवण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते. लहान वासरात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे रिकेट्स (मुडदूस ) (Rickets) हा आजार होऊ शकतो. मोठ्या जनावरात या खनिजांच्या कमतरतेमुळे ऑस्टिओमलेसिआ हा आजार होतो. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी पशुआहारातील कॅल्शिअमचे कार्य आणि कमतरतेविषयी पुढील माहिती दिली आहे. 

जनावरांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण जवळ जवळ एक टक्के एवढे असते. शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम हाड व दातांमध्ये असते. कॅल्शिअम मऊ पेशीत व रक्तात साठवलेले असते. जनावरांच्या उत्पादन आणि आरोग्याच्या व्यवस्थापनात कॅल्शिअम महत्त्वाचा घटक आहे. पशू व्यवस्थापनात हिरवा चारा मुख्यत्वे द्विदल चारा हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे.

कॅल्शिअमचे कार्य कसे चालते?

हाड व दातांची उत्तम वाढ होण्यासाठी, रक्त गोठवण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते.

जनावरांच्या शरीरामध्ये पाण्याचे संतुलन करणे, ऑस्मॉटिक प्रेशर संतुलन करण्यासाठी उपयुक्त ठरते.

मांस पेशी व मज्जा संस्थेवर नियंत्रण करते. शरीरामध्ये विविध प्रकारचे विकर तयार होण्यासाठी मदत करते.

गाई आणि म्हशीमध्ये प्रजोत्पादनासंबंधी समस्या दिसतात.

कॅल्शियमच्या कमतरतेचा परिणाम काय होतो ?

जनावरांची वाढ खुंटते, दूध उत्पादन कमी होते, शरीरातील रक्त गोठण्यास वेळ लागतो. हाडे ठिसूळ होतात.स्नायूत अशक्तपणा येतो.

लहान जनावरात मुडदूस आणि प्रौढ जनावरांत उरमोडीची लक्षणे दिसतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकरी अनुदानासाठीचे  ४८ लाख अर्ज पडून

Agriculture Department Scam: आवटे समितीच्या अहवालात दोन अधिकाऱ्यांवर ठपका

Jaggery Price: श्रावणामुळे गुजरातमध्ये गुळाच्या मागणीत वाढ

Maharashtra Heavy Rain: घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार सरी शक्य

SCROLL FOR NEXT