काळजी पशुधनाची

निर्जंतुक दूध म्हणजे काय?

Team Agrowon

दुधात (milk) असणाऱ्या प्रत्येक घटकाला तापवून त्यातील अपायकारक जीवाणू (bacteria) नष्ट केले जातात. स्टरीलाईज्ड दुधासाठी (sterilized milk) ते ११५ अंश सेल्सिअस तपामानला १५ मिनिटे किंवा १३० अंश सेल्सिअस तपामानला एक सेकंद तापविले जाते. हे निर्जंतुक केलेले दूध बाटलीमध्ये भरले जाते. हे दूध एक आठवड्यापर्यंत मानवी आरोग्याच्या दृष्टीने पिण्यायोग्य असते.

काहीवेळेस दुधासह बाटलीचेही निर्जंतुकीकरण केले जाते. या दुधाने भरलेल्या बाटलीला १०८ ते १११ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यामध्ये १५ ते २० मिनिटे ठेवून, दूध बाटलीसकट निर्जंतुक केलं जाते. यालाच आपण इंग्रजीमध्ये स्टरीलाईज्ड मिल्क (sterilized milk) असं देखील म्हणतो. या दुधातील मानवी आरोग्यास अपायकारक सर्व जीवाणू नष्ट करून दुधाची शेल्फ लाईफ वाढविली जाते.

सर्वसाधारणपणे ७३ अंश सेल्सिअस तापमानाला दूध ठराविक वेळेपर्यंत तापविल्यानंतर दुधातील मानवी आरोग्यास अपायकारक जीवाणू नष्ट होतात. मात्र काही अंशी या जिवाणूंचे अवशेष तसेच राहतात. हे असतं, पाश्चराइज्ड दूध (pastuerized milk).

व्यवसायिक दृष्टीकोनातून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी दुधातील घटकांच्या प्रमाणात बदल करून, प्रक्रियायुक्त दुधाची निर्मिती केली जाते. यामध्ये सुगंधी दूध, जीवनसत्त्वयुक्त दूध, प्रमाणित दूध, कृत्रिम दूध यांचा समावेश होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT