Criteria for goat selection  Agrowon
काळजी पशुधनाची

जाणून घ्या, शेळी निवडीचे निकष

शेळीच्या जातीची उपयुक्तता व उत्पादन क्षमता विचारात घेऊनच शेळ्यांची निवड करावी.

Roshani Gole

शेळीची निवड (goat selection) करताना शेळ्यांच्या जातीनुसार विशिष्ट रंगाची, विशिष्ट आकार असलेली, शिंगाची ठेवण, कानाचा आकार, त्या विशिष्ट जातीनुसार (breeds) असल्याची खात्री करून मगच शेळीची निवड करावी. शेळीच्या जातीची उपयुक्तता व उत्पादन क्षमता विचारात घेऊनच शेळ्यांची निवड करावी.

शेळीचे गुणधर्म (goat characteristics)-

  • अधिक उत्पादनासाठी शेळीने २ वर्षांत ३ वेत दिले पाहिजेत.

  • शेळीचे आरोग्य चांगले आणि शरीराने ती धष्टपुष्ट असावी.

  • दोन पेक्षा अधिक पिल्लांना एका वेळेस जन्म देण्याचे प्रमाण जास्त असावे.

  • शेळीचा स्वभाव शांत असावा.

  • शेळीचे पाय सरळ असावेत. उभी राहताना तिचे पाय एकमेकांस समांतर व मजबूत असावेत.

  • शेळीचे शरीर समोरून मागे जाताना मोठे होत जाणारे असावे.

  • शेळीचे तोंड लांब असावे, नाकपुड्या मोठ्या व लांब असाव्यात, मान लांब, पातळ व खांद्याशी व्यवस्थित जुळलेली असावी.

  • शेळीची छाती भरदार आणि रुंद असावी.

  • दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.

  • दुभती शेळी लठ्ठ नसावी याउलट चपळ असावी.

  • शेळीची कास घट्ट असावी आणि सड पुरेशा लांबीचे असावेत. धार काढल्यानंतर कासेचा आकार कमी व्हायला हवा.

  • शेळी खरेदी करताना शक्यतो दोन दाती व एक वेत झालेली शेळी विकत घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT