biogas plant Agrowon
काळजी पशुधनाची

हे आहेत बायोगॅस प्लांटचे फायदे!

बायोगॅस हे एक ज्वलनशील वायूंचे मिश्रण आहे. बायोगॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन, कार्बन डायऑक्‍साईड, हायड्रोजन सल्फाईड यांसारख्या वायुंचा समावेश होतो.

Team Agrowon

बायोगॅस (Biogas) हे एक ज्वलनशील वायूंचे मिश्रण आहे. बायोगॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन(Methane), कार्बन डायऑक्‍साईड (Carbon Dioxide) , हायड्रोजन सल्फाईड (Hydrogen Sulphide) यांसारख्या वायुंचा समावेश होतो. बायोगॅसमध्ये मिथेन वायूचे प्रमाण सर्वाधिक असून तो ज्वलनशील आहे. बायोगॅस उत्पादनाकरिता जनावरांच्या शेणाचा तसेच गोठ्यातील जनावरांच्या मलमूत्राचा वापर केला जातो. बायोगॅस सयंत्रामध्ये शेण आणि इतर वनस्पतिजन्य पदार्थांना हवेच्या अनुपस्थितीत कुजवून बायोगॅस तयार होतो.

बायोगॅसचे फायदे-

स्वयंपाकासाठी इंधन म्हणून बायोगॅसचा वापर केला जाऊ शकतो. असे केल्याने इंधनासाठी लाकडाची गरज भासणार नाही.

लाकडाच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुरामुळे महिलांमध्ये फुफ्फुसांच्या आजारांचे प्रमाण वाढते. यावर बायोगॅस एक चांगला पर्याय आहे. बायोगॅसमुळे वातावरण प्रदूषित होत नाही.

बायोगॅसचा वापर स्वयंपाकासाठी इंधन म्हणून करता येतो. वीजनिर्मिती करण्यासाठीही बायोगॅसचा वापर केला जातो. बायोगॅसच्या वापरामुळे डिझेल आणि पेट्रोलच्या वापरातही बचत होते. यामध्ये विहिरीतून पाणी खेचणारा पंप चालवणे, मळणी यंत्र चालविणे यांचा समावेश होतो.

बायोगॅस संयंत्रामधून मिळणारी स्लरी उत्तम खत म्हणून वापरू शकता. मोठ्या संख्येने जनावरे असलेल्या शेतकऱ्यांनी बायोगॅस सयंत्र बसवून घेतल्यास
त्यापासून विद्युतनिर्मिती केली जाऊ शकते.

बायोगॅस युनिटमुळे जनावरांच्या शेणाचे आणि मुत्राचे रूपांतर जैविक व सेंद्रिय खतामध्ये होते अन्यथा शेण, मलमूत्र जमिनीवर पडून जलस्रोत प्रदूषित होत असतात. साधारणपणे दोन घनमीटर बायोगॅस सयंत्रामुळे दरमहा २६ किलो एलपीजी गॅसची बचत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT