Green Fodder  Agrowon
काळजी पशुधनाची

Green Fodder : जनावराला हिरवा चारा देताना काय काळजी घ्यावी?

Fodder Crop : जनावराला दिला जाणारा चारा रुचकर असावा. चारा एकदम बारीक कुट्टी करून देऊ नये. कुट्टीचा आकार १ ते २ इंच राहिल्यास जनावरांचे रवंथ उत्तम होऊन चारा व्यवस्थित पचतो. त्याबरोबरच दुधातील फॅटचे प्रमाण उत्तम राहण्यास मदत होते.

Team Agrowon

Green Fodder Crop : कमी किंमतीत पौष्टिक घटक मिळावेत यासाठी दुभत्या जनावरांना हिरवा चारा देणे आवश्यक ठरते. स्थानिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या हिरव्या चाराचा वापर करून पशुखाद्याची किंमत कमी करता येते.

हिरवा चारा मऊ, चवदार असण्याव्यतिरिक्त, जनावराला पचायलाही सोपा असतो. चाऱ्यात विविध पौष्टिक घटकांचा पुरेशा प्रमाणात समावेश असतो. असा हा हिरवा जनावरांना देताना काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती घेऊ.

जनावराला दिला जाणारा चारा रुचकर असावा. चारा एकदम बारीक कुट्टी करून देऊ नये. कुट्टीचा आकार १ ते २ इंच राहिल्यास जनावरांचे रवंथ उत्तम होऊन चारा व्यवस्थित पचतो. त्याबरोबरच दुधातील फॅटचे प्रमाण उत्तम राहण्यास मदत होते.

चारा जशास तसा लांब धाटे न देता कुट्टी करून हिरवा व वाळलेला चारा एकत्र मिसळून द्यावा. यामुळे चाऱ्याचा अपव्यय टाळून पचनीयता वाढते.

जनावरांना चारा खाऊ घालताना जनावराचे शरीर वजन, शरीरवाढ, बैलांची कार्यक्षमता लक्षात घेऊन चारा योग्य प्रमाणात द्यावा.

सरसकट सर्वच जनावरांना समान चारा देऊ नये. जनावरांची वर्गवारी करून चारा दिल्यास जनावरांचे आरोग्य उत्तम राहून जास्तीचे उत्पादनही मिळते. आणि चाऱ्याचा अपव्यय टाळला जातो.

चारा खाण्यासाठी सर्व जनावरांना योग्य प्रमाणात जागा व चारा उपलब्ध करून द्यावा.

जनावरांना केवळ हिरवा चारा किंवा वाळलेला चारा न देता दोन्हींचे योग्य प्रमाणात मिश्रण द्यावे. जनावरांच्या आहारात द्विदल आणि एकदल चाऱ्याचा एकत्रित वापर करावा.

व्यवस्थित गव्हाण तयार करून चारा दिल्यास सर्व चारा खाल्ला जातो. जनावरांना सतत चारा न देता दिवसातून केवळ २ ते ३ वेळा योग्य प्रमाणात चारा खाण्यास द्यावा. यामुळे रवंथ चांगले होऊन चाऱ्याची पचनीयता वाढते व पोषणतत्वांचा वाढीव उत्पादनासाठी उपयोग होतो.

चारा खाऊ घालण्याच्या वेळा ठराविक देवून त्यात अचानक बदल होणार नाही याची काळजी घ्यावी.

सतत केवळ एकाच प्रकारचा चारा न देता २ ते ३ चारा पिकांचे मिश्रण द्यावे, यामुळे आवश्यक सर्व पोषणतत्त्वे मिळायची शक्यता वाढते.

गव्हाणी नेहमी स्वच्छ करून नवीन चारा खाण्यास द्यावा. शेण, लघवी, चिखल पडलेल्या चारा जनावरांच्या आहारात वापर करू नये. कारण घाण वास येणारा चारा जनावरे खाणार नाहीत. अशा चाऱ्यामध्ये अंतरपरोपजीवीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

चारा गव्हाणीमध्ये टाकत असताना सर्व जनावरांना योग्य प्रमाणात चारा मिळतो का हे पाहावे.

भिजलेला चारा, पानांवर दव असणारा चारा जनावरांच्या आहारात वापर करू नये. अशा चाऱ्यावरील पाणी निघून गेल्यावर जनावरास खाण्यास द्यावा कारण ओला चारा जनावरे आवडीने खात नाहीत.

ओल्या, भिजलेल्या चाऱ्याची कुट्टी करून साठा करू नये. कारण अशा चाऱ्याला कुबट वास येऊन हा चारा जनावरे खात नाहीत. त्याचबरोबर अशा चाऱ्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT