Animal Husbandry Agrowon
काळजी पशुधनाची

Fodder Shortage : चाराटंचाईच्या काळात उपलब्ध पर्यायांवर भर द्या

Animal Husbandry : चाराटंचाईच्या काळात काटेविरहीत निवडुंगाचा वैरण म्हणून वापर करता येणार आहे, अशा पर्यायावर पशुपालकांनी भर देण्याचे आवाहन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.

Team Agrowon

Nagpur News : चाराटंचाईच्या काळात काटेविरहीत निवडुंगाचा वैरण म्हणून वापर करता येणार आहे, अशा पर्यायावर पशुपालकांनी भर देण्याचे आवाहन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.

माफसूअंतर्गत असलेले केव्हीके दूधबर्डी, सेंटर फॉर पिपल्स कलेक्टिव्ह यांच्या संयुक्‍त सहकार्याने पशुपालक व शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संचालक (शिक्षण), डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक (संशोधन) डॉ. नितीन कुरकुरे, संचालक (विस्तार) डॉ. अनिल भिकाने, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आरजू सोमकुवर, सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्हचे संचालक संजय कुलकर्णी, अजिंक्‍य शहाणे, केव्हीके दूधबर्डीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सारीपूत लांडगे उपस्थित होते.

सजल कुलगर्णी यांनी मनोगत व्यक्‍त केले. डॉ. अनिल भिकाने यांनी शास्त्रोक्‍त पशुसंगोपन या विषयी माहिती दिली. डॉ. संदीप चौधरी, डॉ शिल्पश्री शिंदे आणि डॉ. शेखर बढे यांनी रेबीज तसेच दुध जागृती अभियानाविषयी सांगीतले. प्रास्ताविक डॉ. सारीपूत

लांडगे यांनी केले. संचालन व आभार डॉ. श्‍वेता लांडे यांनी मानले. या वेळी डॉ. गजानन अंभोरे, डॉ. अतुल ढोक, डॉ. गितांजली ढुमे, प्रवीण बागडे, राजेंद्र सावरकर, मोहन कापसे, मोहन गौतम, गौरी भदोरिया यांची उपस्थिती होती.

...यांचा झाला सन्मान

कार्यक्रमात गौळाऊ पैदासकार संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज कालोकार, अमरावती जिल्हा गवळी समाजाचे अध्यक्ष श्री. खडके, उमरखेड येथील बंदी भाग विकास समिजतीचे अध्यक्ष बाबुसिंग जाधव, रबारी समाजाचे मशरु रबारी, भरवाड समाजाचे रामजी जोगराणा, एकनाथ गजभिये, विक्‍की बढेल यांनी पशुपालन क्षेत्रात केलेल्या कामाची दलख घेत सन्मान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marine Product Exports : भारत कृषी आणि सागरी उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश होईल; केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांचा विश्वास

MGNREGA Scheme: रोजगार हमी योजनेतील गोंधळ थांबविण्याची मागणी

Ai Conference: ‘एआय’ परिषदेत सात कोटी कशावर खर्च केले?

Panchayat Samiti Chairman: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा पंचायत समिती सभापती भाजपाचे

Congress Protest: 'सरेंडर दे सिलिंडर'; गॅसचं पोस्टर घेऊन पटोले, वडेट्टीवार विधानभवनात

SCROLL FOR NEXT