colostrum feeding of goat kid
colostrum feeding of goat kid Agrowon
काळजी पशुधनाची

पिलांच्या वाढीसाठी चिकाचे महत्व !

Team Agrowon

शेळीपालन (goat farming) व्यवसायातील नफा हा पिल्लांच्या म्हणजे करडांच्या संख्येवर, त्यांच्या वाढीवर ठरत असतो. शेळी विल्यानंतर सुरुवातीच्या २४ तासात येणाऱ्या घट्ट व पिवळसर दुधास चीक (colostrum) म्हणतात. ह्या चिकात शेळीच्या पिल्लांच्या वाढीसाठी रोगप्रतिकारक घटक असल्यामुळे चीकाचा वापर इतर कशासाठी न वापरता तो पिल्लांनाच पाजला पाहिजे.

पिल्लांसाठी चिकाचे महत्त्व-

नवीन जन्माला आलेल्या पिल्लांमध्ये कर्बोदकांच्या स्वरूपातील साठवलेली ऊर्जा कमी असते. या दिवसात पिल्लू आहारासाठी पूर्णपणे शेळीवर अवलंबून असते. चिकाच्या स्वरुपात पिल्लांना मुबलक प्रमाणात ‘जीवनसत्त्व-अ’ चा पुरवठा होत असतो. चीकामुळे पिल्लांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासही मदत होते.

चीकातील प्रथिने दुधापेक्षा ३ ते ५ पटीने अधिक असतात. चिकामध्ये इम्युनोग्लोब्युलिन नावाचा घटक मोठ्या प्रमाणात असतो. चिकामध्ये 'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण दुधापेक्षा ५ ते १५ टक्क्यांनी अधिक असते. चिकामध्ये रायबोफ्लेविन, कोलीन, थायमिन आणि पॅन्टोथेनिक अॅसिड हे घटक जास्त प्रमाणात असतात. या घटकांचा वापर पिल्लांच्या निरोगी वाढीसाठी होतो. चीकातील या घटकामुळे पिल्लांच्या पोटातील चिकट घाण साफ होण्यास मदत होते. चीक हा पिल्लांच्या दृष्टीने परिपूर्ण आहार आहे.

पिल्लाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या २४ तासांत दर ३ ते ४ तासांच्या अंतराने त्याला एकूण त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक पाजायला हवा. म्हणजे अडीच किलो वजनाच्या पिल्लाला दिवसभरात २५० मिली चिक पाजला पाहिजे. पिल्लांचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे काही तासच पिल्लांची पचनसंस्था चिक उत्तम प्रकारे पचवू शकते. चिकाचे पचन होण्याची क्षमता २४ तासांनंतर हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे चिक लवकरात लवकर पाजायला हवे.

पिल्लाचे जन्मतः वजन आणि हवामान यावर चिकाचे प्रमाण किती द्यावे हे ठरते. पिल्लाचा जन्म खराब हवामानात झाला असल्यास त्याची उर्जेची गरज अधिक असते. पिल्लाचा जन्म पावसाळ्यात झाल्यास प्रति किलोमागे २०० मिली चिकाची गरज असते. याउलट कोरड्या हवामानात पिल्लांची चिकाची गरज फक्त १५० मिली असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT