Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : परभणी जिल्ह्यात म्हशींच्या वाहतुकीस अटींसह परवानगी

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांची माहिती

टीम ॲग्रोवन

परभणी : ‘‘लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर म्हशींच्या वाहतुकीस (Cattle Transport) अटींसह परवानगी देण्यात आली आहे. म्हशींची आरोग्य प्रमाणपत्रासह संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून वाहतूक केली जाऊ शकते,’’ अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन (Livestock) उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे (Dr. P,P, Nemade) यांनी दिली.

लम्पी स्कीन आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभरातील बाधित क्षेत्रातून ईपी सेंटर (केंद्र गाव)पासून एक कि.मी.च्या आत म्हशींच्या हालचालींवर निर्णायकपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. म्हशींच्या नियमित आरोग्य प्रमाणपत्रासह संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून (घोषित ईपी सेंटर व्यतिरिक्त क्षेत्र) वाहतूक केली जाऊ शकते.

प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील म्हशींची पशुवैद्यकांमार्फत तपासणी करावी. जनावरांना सौम्य लक्षणे दिसली तरीही त्यांना हालचाल करण्यास परवानगी देऊ नये. वाहतूक करण्यापूर्वी सोबत प्राधिकरणाचे आरोग्य प्रमाणपत्र असावे. शक्यतो वाहतुकीपूर्वी पीसीआर चाचणी करून घ्यावी. त्याचा अहवाल नकारार्थी असावा, या अटी देण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालय, भारत सरकार यांनी निर्देशित केल्यानुसार, म्हशींमध्ये लम्पी स्कीनची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. त्याची तीव्रता अत्यल्प आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Argentina Agriculture : भारत आणि अर्जेंटिनामध्ये करार; तेलबिया, कडधान्यासाठी दोन्ही देश संयुक्त संशोधन करणार

Pradnya Satav Resigns: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश

Maize Procurement: कन्नड तालुक्यात ६६१ नोंदण्या झाल्या पूर्ण

Police Patil Bharati: बीड जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीमधील बिंदूनामावलीचा अडसर दूर

Vertical Farming : शहरी भागातील उभ्या शेतीला जपानच्या तंत्रज्ञानाची साथ?

SCROLL FOR NEXT