Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

जनावरांतील पिका आजाराची समस्या

जनावरांमध्ये अनेकदा प्लॅस्टिकच्या गुंत्यामुळे रवंथ करण्यास तसेच पोटात निर्माण झालेला वायू बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे पोटफुगी होऊन श्वास कोंडला जातो. हे लक्षात घेऊन जनावरांच्या आहारात प्लॅस्टिक पिशव्या, अखाद्य वस्तू जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

टीम ॲग्रोवन

डॉ. गणेश सावळे, डॉ.प्रशांत गाढवे

अविघटनशील प्लास्टिक पिशव्यांचा अन्नपदार्थ साठवणूक, भाजीपाल्याचा कचरा फेकण्यासाठी सर्रास वापर होतो. असे खाद्य मोकाट जनावरांच्या आहारात येते. मोकाट जनावरांना मुबलक प्रमाणामध्ये चारा मिळत नाही. त्यामुळे अशा जनावरांमध्ये कुपोषणामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. या जनावरांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, कॉपर, कोबाल्ट, झिंक इत्यादी क्षारांच्या कमतरतेमुळे माती खाणे किंवा खाण्यासाठी योग्य नसलेल्या पदार्थांचे सेवन करण्याची सवय लागते. हा आजार पिका नावाने ओळखला जातो. या आजारामुळे प्लास्टिक, माती, इतर प्राण्यांची विष्टा असे अयोग्य पदार्थ जनावरांच्याकडून खाल्ले जातात. जनावरांमध्ये अनेकदा प्लॅस्टिकच्या गुंत्यामुळे रवंथ करण्यास तसेच पोटात निर्माण झालेला वायू बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे पोटफुगी होऊन श्वास कोंडला जातो. शवविच्छेदना दरम्यान अशा जनावरांच्या पोटामध्ये प्लास्टिक पिशव्याबरोबरच तार, खिळे,पट्टे आणि इतर अयोग्य वस्तू आढळून येतात. पोटातील अणकुचीदार वस्तूंमुळे टीआरपी (ट्रोमॅटिक रेटिक्युलोपेरिटोनायटिस) हा आजार होऊन जनावर जगण्याची शक्यता कमी होते. प्लास्टिकच्या गुंत्यामुळे जनावरांमध्ये पोटफुगी अथवा पोट गच्च होण्याच्या समस्या उद्भवतात.

जनावरांतील प्लास्टिक समस्येची कारण मिमांसा ः

१. रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये चाऱ्यातील अयोग्य वस्तू काढू शकण्याची क्षमता नसते.

२. भूकेपोटी भटकी जनावरे प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले अन्न खातात.

३. शरीरामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे संतुलन बिघडलेले असेल तर जनावरांच्या खाण्यात प्लास्टिक किंवा इतर अयोग्य पदार्थ येण्याची शक्यता वाढते.

४. गाभणकाळात जनावरांच्या ऊर्जा वापरात वाढ होते. त्यामुळे देखील अयोग्य पदार्थ जनावरांकडून खाल्ले जातात.

आजारी जनावर ओळखण्याची लक्षणे ः

१) प्लास्टिक खाल्लेले जनावर ओळखणे सोपे नसले तरी त्यांच्या बाह्य लक्षणांवरून साधारण अंदाज बांधता येतो. अशी लक्षणे प्लास्टिक खाण्याचा कालावधी आणि प्रमाणावर अवलंबून असते.

२) सुरवातीला अनेक महिने जनावरांमध्ये लक्षणे आढळून येत नाहीत. परंतु रवंथ करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन लक्षणे दिसायला लागतात.

३) निराशा, कमी जास्त भूक, वारंवार पोटफुगी, दूध कमी होणे, वजन कमी होणे, रवंथ करणे थांबणे, पोट गच्च होणे इत्यादी लक्षणे आढळतात.

४) पाळीव जनावरांमध्ये प्रजनन क्षमतेत होणारी घट आणि कर्करोगासारख्या समस्या उद्भवू शकतात.

प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या समस्या ः

१. रवंथ करणारी पाळीव जनावरे, वन्यजीव प्लॅस्टिकमुळे पोट गच्च होऊन श्वास न घेता आल्याने मरण पावतात.

२. पोटात प्लॅस्टिकमुळे बाधित होण्याचे प्रमाण गाईंमध्ये जास्त आढळून आले आहे. त्यानंतर म्हशी, मेंढ्या, आणि शेळ्यामध्ये समस्या दिसते.

३. विदेशी गाई देशी गाईपेक्षा जास्त बाधित होतात.

४. मादी जनावरे नर जनावरांपेक्षा अधिक ग्रस्त होतात.

५. वयस्क जनावरांमध्ये या समस्या अधिक गंभीर असतात.

६. अशक्त कुपोषित जनावरे प्लॅस्टिकमुळे जास्त बाधित होतात.

७. जनावरांमध्ये प्लास्टिक खाण्याचे तसेच मृत्यू होण्याचे प्रमाण

मार्च ते जुलै या काळामध्ये जास्त दिसते.

प्रतिबंधात्मक उपाय योजना ः

१. प्लास्टिक आणि कचऱ्याची सुनियोजित विल्हेवाट करावी.

२. जनावरांसाठी पौष्टिक चाऱ्याची सोय करावी. उघड्यावरील प्लास्टिक पिशव्यांतील अन्न व इतर पदार्थ खाण्यापासून रोखावे.

३. प्लास्टिकचा पुनर्वापर आणि प्लास्टिक पर्यायी जैव विघटनशील पिशव्यांचा वापर करावा.

४. आपापल्या परिसरातील प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.

संपर्क ः

डॉ. गणेश सावळे, ९५९४१४५०५१, डॉ.प्रशांत गाढवे,९५९४१४५०५१

( मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT