Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी’बाधित जनावरांत वासरांची संख्या जास्त

Lumpy Skin Latest Update : नगरसह राज्यातील बहुतांश भागात लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. राज्यात १ जून पासून आजपर्यंत २८१ तालुक्यांतील २ हजार ८६१ गावांत सुमारे एक लाख जनावरे लम्पीने बाधित झाली आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नगरसह राज्यातील बहुतांश भागात लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. राज्यात १ जून पासून आजपर्यंत २८१ तालुक्यांतील २ हजार ८६१ गावांत सुमारे एक लाख जनावरे लम्पीने बाधित झाली आहेत. त्यातील ७१ हजार जनावरे बरी झाली. मात्र बाधित जनावरांत सुमारे २५ ते ३० टक्के वासरे आहेत.

जूनपासून या आजाराचे प्रमाण अधिक वाढले आहे. लम्पीची साथ आटोक्यात आणण्यासाठी जनावरांचे बाजार, चारा वाहतूक, पशुप्रदर्शने, जनावरांचे संबंधित उत्सव बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय गायवर्गीय जनावरे, चारा वाहतुकीस निर्बंध घातले आहेत. बाधित भागात पशुधनाची ऑनलाइन खरेदी-विक्रीही बंद केली आहे.

बाधित भागातून बाधित प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी, अन्य कोणताही भाग, उत्पादन, असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी बंदी घातली आहे.

बाधित परिसरात स्वच्छता ठेवून व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे, ‘लम्पी स्किन’चा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्याने वीर्यमात्रा बनविणाऱ्या संस्थांमार्फत होणारे वीर्य संकलन थांबवले आहे.

नगर जिल्‍ह्याचा विचार केला तर यंदा जिल्ह्यात ४ हजार ३९३ जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. त्यात ३२२० जनावरे आजारातून बरी झाली आहेत. तर २६२ जनावरांचा मृत्यू झाला. बाधित जनावरांत सुमारे १११० वासरे आहेत. त्यातील ७६८ वासरे या आजारातून बरी झालेली आहेत. पशुसंवर्धन विभागाने वासरांच्या मृत्यूचा आकडा निश्चित केलेला नसला तरी यंदा पहिल्यांदाच बाधित वासरांची संख्या वाढली आहे.

१ जूनपासून नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित वासरे

अकोले ः १२, जामखेड ः ६, कर्जत ः १४, कोपरगाव ः १४३, नगर ः ६०, नेवासा ः १२०, पारनेर ः २८, पाथर्डी ः १०५, राहाता ः ५३, राहुरी ः २८१, संगमनेर ः ७, शेवगाव ः ९२, श्रीगोंदा ः १६२, श्रीरामपूर ः २६

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी करण्यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणासह विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा बाधित जनावरांत वासरांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वासरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त, नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT