Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : आजऱ्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढला

आजरा तालुक्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढत आहे. दीड महिन्यात तालुक्यात ३० जनावरांना या आजाराची लागण झाली.

टीम ॲग्रोवन

आजरा, जि. कोल्हापूर : आजरा तालुक्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) चा प्रादुर्भाव वाढत आहे. दीड महिन्यात तालुक्यात ३० जनावरांना या आजाराची लागण (Lumpy Skin Infection) झाली. यामध्ये चार जनावरांचा (Animal Died) मृत्यू झाला. पशुवैद्यकीय विभागाकडून या आजाराच्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण पशुपालकांकडून अपेक्षित प्रतिसाद नसून त्यांना आजाराचे गांभीर्य दिसत नसल्याचे चित्र आहे.

तालुक्यात पेंढारवाडी येथे लम्पी स्कीनची सुरुवात झाली. तालुक्यातील उत्तूर विभागातील काही गावांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये उत्तूर व बहिरेवाडतील जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण मोठे आहे. बहिरेवाडीमध्ये २६ जनावरे लम्पी स्कीनग्रस्त आढळली. यामध्ये तीन बैल व एका वासराचा मृत्यू झाला आहे.

लम्पी स्कीनच्या नियंत्रणासाठी तालुका प्रशासनासह पशुवैद्यकीय विभाग प्रयत्नशील आहे. पण त्यांना पशुपालकांतून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. जनावरांचा आठवडी बाजार बंद आहे. खरेदी- विक्रीवर प्रतिबंध लावला आहे. तरीही तालुक्यात अवैध मार्गाने जनावरे आणली जात आहेत. सुगी सुरू असल्याने जनावरे खरेदीचे प्रमाण छुप्प्या रीतीने सुरू आहे. त्यामुळे लम्पी स्कीनचा प्रसार व नियंत्रण करणे कठीण बनल्याचे पशुवैद्यकीय विभाग सांगतो.

७ हजार ६३८ जनावरांचे लसीकरण

पशुवैद्यकीय विभाग व गोकुळ दुध संघाने तालुक्यातील सुमारे ७ हजार ६३८ जनावरांचे लसीकरण केले आहे. हे खरे असले तरी लम्पी स्कीनला रोखणे अडचणीचे झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन त्यांचे योग्यप्रकारे प्रबोधन करण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT