Lumpy skin : लम्पी स्कीन’विरोधात शर्थीचे प्रयत्न

रायगड जिल्ह्यात ९० टक्के लसीकरण; ३१ जनावरे अजूनही बाधित
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

अलिबागः गाय, म्हैस वर्गातील जनावरांना होणारा लम्पी स्कीन (Lumpy skin) या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव गेल्या दीड महिन्यापासून रायगड जिल्ह्यात आहे. सध्या जिल्ह्यामध्ये ३१ जनावरे अजूनही बाधित आहेत. त्यामुळे लम्पी स्कीनला रोखण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन व राज्य शासन पशुसंवर्धन विभागाने बाधित जनावरांवरील उपचारांबरोबरच लसीकरणावर अधिक भर दिला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये १३ सप्टेंबरपासून लम्पी स्कीन या आजाराने शिरकाव केला आहे. सुरुवातीला कर्जत तालुक्यात या आजाराने बाधित जनावरे आढळून आली. त्यात तालुक्यातील पिंपलोली, अंबिवली, वावे, खांडस, मिरचूलवाडी, अवचरे, पळसदरी, धामणी, चई, रोहा तालुक्यातील आंबिवली, दुर्तली, अलिबाग तालुक्यातील चौल, उरण तालुक्यातील गावठाण - चिरले, चांजे, माणगाव तालुक्यातील घोडशेतवाडी, रिळे.

पनवेल पाले खुर्द, नावडे, वहाळ, खालापूर तालुक्यातील वढगाव, महाडमधील रुपवली, श्रीवर्धनमधील भेंडखोल, पेणमधील अंतोरे, व सुधागड- पालीमधील नांदगाव येथे आत्तापर्यंत १८८ लम्पी स्कीन बाधित जनावरांची नोंद झाली होती. कर्जत तालुक्यातच १५६ जनावरे सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती.

Lumpy Skin
Lumpy Skin : लसीनंतरही ‘लम्पी स्कीन’ ने रोज ५० जनावरांचा मृत्यू

स्कीन आजाराचा वाढता प्रादुर्भाव

नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्ह्यामध्ये लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी बाधीत जनावरे सापडली आहेत; तसेच पाच किलोमीटर परिघातील जनावरांचे लसीकरण केले आहे.

जनजागृतीवर विशेष भर

लम्पीचा स्कीनचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले. जिल्हा परिषदेच्या शंभर व राज्य शासनाच्या २२ अशा एकूण १२२ पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला.

ठिकठिकाणी जनजागृती सुरू करण्यात आली. तसेच लसीकरणावर अधिक भर देण्यात आला. रायगड जिल्ह्यासाठी १ लाख ६५ हजार लसीचा साठा प्राप्त झाला आहे. त्यापैकी एक लाख ५९ हजार ६१५ लसीकरण पूर्ण झाल्याने लम्पी स्कीन नियंत्रणात आला आहे.

कर्जत मध्ये बाधितांची संख्या अधिक

रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत, रोहा, अलिबाग, उरण, माणगाव, पनवेल, खालापूर, महाड, श्रीवर्धन, पेण, सुधागड या तालुक्यांमध्ये लम्पीबाधित जनावरे आढळून आली. उपचारामुळे अनेक बाधित जनावरांना बरे करण्यास पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे.

सध्या कर्जत तालुक्यात २५, पनवेलमध्ये चार व खालापूरमध्ये दोन जनावरे बाधित आहेत. यात सर्वात जास्त बाधितांची संख्या कर्जत तालुक्यात असून बाधित जनावरांच्या पाच किलोमीटर परिघात लॉकडाऊन आहे.

गाय व म्हैस वर्गातील जनावरांची संख्या

१,७६,७७५

बाधित जनावरांची संख्या

१८८

दगावलेल्या जनावरांची संख्या

1७

बरे झालेल्या जनावरांची संख्या

१४०

एकूण प्राप्त लस

१६५०००

एकूण लसीकरण

१५९६१५

शिल्लक लस

५३८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com