Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Konkan Kapila : पशुपालकांच्या सहयोगातूनच ‘कोकण कपिला’चा विकास

टीम ॲग्रोवन

दापोली ः ‘‘कोकण कपिला (Konkan Kapila) गोवंश कोकण आणि पश्‍चिम घाटातील काटक वैशिष्ट्यपूर्ण देशी गोवंश (Desi Cow) आहे. याची जातिवंत पैदास, वंशावळ सुधारणा तसेच व्यवस्थापनाचे तंत्र पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे.

शेती आणि पशू व्यवस्थापनातील नवे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत जलद पोहोचविण्यासाठी विद्यापीठ, पशुपालक आणि पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने आम्ही नियोजन केले आहे,’’ असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांनी व्यक्त केले.

कोकण कपिला गोवंश संवर्धन आणि तंत्रज्ञान विस्तारासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि आंबा (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी डॉ. सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विद्यापीठाने २०१८ मध्ये कोकण आणि सह्याद्री पट्ट्यात आढळणाऱ्या कोकण कपिला गोवंशाची कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू संशोधन ब्युरो या राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये नोंदणी केली. कोकणातील वातावरणात वाढणारी, काटक आणि कमी व्यवस्थापन खर्च असणाऱ्या या गोवंशाचे संवर्धन आणि तंत्रज्ञान विस्तारासाठी विद्यापीठ आणि शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून कोकण कपिला गोवंशपालकांना एकत्र करून कोकण कपिला गोवंश पैदासकार संघटना स्थापन करण्यात येणार आहे.

या करारप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, अधिष्ठाता डॉ.आनंद नरंगळकर, सहयोगी अधिष्ठाता आणि पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी. जी. देसाई, डेअरी व्यवस्थापक डॉ. नरेंद्र प्रसादे, उपसंशोधन संचालक डॉ. संजय तोरणे, शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळेचे प्रतिनिधी सुनील गद्रे, प्रसाद बेंडके, अमित गद्रे तसेच विद्यापीठाच्या विविध विभागातील तज्ज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते.

स्वतंत्र प्रक्षेत्र विकसित

सुधारित तंत्राने पशू व्यवस्थापन, दूध उत्पादन वाढ, जातिवंत पैदास, शेण, गोमूत्रापासून सेंद्रिय खते, कीडनाशकांची निर्मिती तसेच पशुपालकांच्या प्रशिक्षणावर भर दिला आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पशू पैदास केंद्र, निळेली (जि. सिंधुदुर्ग) आणि मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली (जि. रत्नागिरी) येथे कोकण कपिला गोवंश संवर्धनासाठी स्वतंत्र प्रक्षेत्र विकसित करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT