Poultry Industry Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Feed : पशुखाद्य बॅगवर घटक न नोंदविणाऱ्यांवर कारवाई करा

Poultry Feed : पशुखाद्याच्या बॅगवर घटकांची माहिती नमूद असावी, असा शासन निर्णय आहे. पोल्ट्री व्यावसायिकांच्या हिताचे इतरही अनेक निर्णय घेण्यात आले.

Team Agrowon

Nagpur News : पशुखाद्याच्या बॅगवर घटकांची माहिती नमूद असावी, असा शासन निर्णय आहे. पोल्ट्री व्यावसायिकांच्या हिताचे इतरही अनेक निर्णय घेण्यात आले. त्या सर्वांची अंमलबजावणी होण्यासाठी कठोर तरतुदींचा अवलंब व्हावा प्रसंगी संबंधित यंत्रणांवर कारवाई करावी, अशी मागणी पोल्ट्री योद्धा फेडरेशनकडून करण्यात आली आहे.

राज्याचे नवनियुक्‍त पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची बुधवारी (ता.११) भेट घेत ही मागणी करण्यात आली. या वेळी शरद गोडांबे, नंदकुमार चौधरी, कमलाकर शिंदे यांची उपस्थिती होती. या वेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार, शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे.

सुमारे सात लाखांपेक्षा अधिक शेतकरी हा व्यवसाय करतात. त्यामध्ये करारावर पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. मात्र कमी वेळात पक्ष्यांचे वजन जास्त मिळावे याकरिता खाद्यान्नांमध्ये विशिष्ट घटक मिसळले जातात, असा संशय आहे. सोबतच महागड्या पिशव्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे पशुखाद्य पुरविण्याचीही शक्‍यता आहे.

त्याच कारणामुळे पशुखाद्याच्या बॅगवर त्यातील घटकांची माहिती नोंदविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत शासनस्तरावरून २२ जुलैला परिपत्रक काढत याविषयीचे निर्देश पशुखाद्य उत्पादकांना देण्यात आले. परंतु आज तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटूनही संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.

कंपन्यांना फायदा होत असल्याने त्यांच्याकडून यासाठी टाळाटाळ होत आहे. त्यामुळे या संदर्भातील मुद्दा पुन्हा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर २ सप्टेंबरला मांडण्यात आला. त्यावेळी त्यांनी शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्याचाही कोणताच परिणाम कंपन्यांवर न झाल्याने आता संबंधितांविरोधात कारवाई करावी, अन्यथा या विरोधात आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: यंदा १० टक्क्यांनी वाढले मतदान

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलण्यास मुख्यमंत्र्यांची मनाई

Rabi Crop Insurance: रब्बीच्या पीकविम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

GST Reforms : जीएसटी कपातीमुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचा शेतकऱ्यांना फायदा; केंद्रीय रसायन व खत मंत्र्यांचा दावा

RBI Monetary Policy: कर्जाचा हप्ता कमी होणार; आरबीआयकडून रेपो दरात कपात

SCROLL FOR NEXT