Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccine : सिंधुदुर्गला ‘लम्पी स्कीन’ प्रतिबंधक ३५ हजार लसी प्राप्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झालेला नसला, तरी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील गायवर्गीय १ लाख ५ हजार ५०८ जनावरांना लसीकरणाचे नियोजन केले आहे.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) झालेला नसला, तरी पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) जिल्ह्यातील गायवर्गीय १ लाख ५ हजार ५०८ जनावरांना लसीकरणाचे (Lumpy Vaccination) नियोजन केले आहे.

जिल्ह्याला आतापर्यंत ३५ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखी ७० हजार लसी उपलब्ध होतील, अशी माहिती पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. आर. बी. दळवी यांनी दिली.

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अद्याप जिल्ह्यात झालेला नाही. परंतु जिल्ह्यातील जनावरांचे सर्वेक्षण पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात गायवर्गीय १ लाख ५ हजार ५०८ जनावरे असून या जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने जनावरे असलेल्या ठिकाणी लसीकरण सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार आणि दुसऱ्या टप्प्यात २५ हजार अशा एकूण ३५ हजार लसी उपलब्ध आहेत. आतापर्यंत १ हजार २८९ जनावंराचे लसीकरण केले आहे. तालुकानिहाय लसींचे वितरण केले आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७७ तर राज्य शासनाचे २५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परंतु या दवाखान्यांमधील सुमारे ९१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम राबविताना अडथळे निर्माण होत आहेत.

सनियंत्रण कक्ष

जिल्ह्या लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची माहिती उपलब्ध व्हावी, लसीकरणात येणाऱ्या समस्या दूर करता याव्यात याकरिता सिंधुदुर्गनगरी येथे सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव नसला तरी जिल्ह्यातील पशुपालकांनी गाफील राहू नये. त्यांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करावे.
डॉ. आर. बी. दळवी, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT