Goat Shed Construction  Agrowon
काळजी पशुधनाची

शेळीपालन व्यवसाय करत असताना जागेची निवड कशी करावी?

शेळीपालन व्यवसायामध्ये जागेची योग्य निवड महत्त्वाची आहे. यामुळे शेळ्यांच्या खाद्याचे आणि निवाऱ्याचे व्यवस्थापन सोयीस्कर जाते.

Team Agrowon

शेळीपालन (goat farming) व्यवसायासाठी जागेची निवड करताना, जागा वाहतुकीच्या रस्त्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असली पाहिजे. रस्त्यापासून जास्त जवळ असल्यास, ध्वनी आणि वायू प्रदुषणाचा त्रास, तसेच चोरीचीही दाट शक्यता असते. सोबतच जागा मार्केटपासून दूरवर नसावी आणि वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असाव्यात. पशुवैद्यकीय दवाखाना जवळ असावा. २४ तास विजेची आणि पाण्याची सोय असावी.

निवडण्यात येणाऱ्या जागेला मागे-पुढे विस्तारण्यास वाव असावा. शेड औद्योगिक वसाहती, दूषित पाण्याचे स्रोत यांपासून दूर असावी. आजूबाजूच्या परिसरातील झाडे झुडपे, डोंगर वाऱ्याची दिशा आणि वेग याची माहिती घेऊनच शेडचे बांधकाम करावे. यावरूनच गोठ्याचे छप्पर, मोकळी जागा यांचे प्रमाण कसे असले पाहिजे ते ठरवता येते.

मालकाचे घर जवळपास असावे. मजुरांची गरजेनुसार उपलब्धता असली पाहिजे. गोठ्याची जागा उंचावर असावी. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मुरमाड जमीन असावी.

गोठ्याच्या सभोवताली भरपूर सूर्यप्रकाश येईल आणि वाऱ्यापासून अटकाव करता येईल अशा प्रकारची सभोवतालची झाडी असावी. शेडची लांबी पूर्व-पश्चिम आणि रुंदी दक्षिणोत्तर असावी.

बोकड आणि करडांना खालीलप्रमाणे बंदिस्त आणि त्याच्या दुप्पट मोकळी जागा आवश्यक आहे.

करडाना छताखाली ५ चौरस फूट आणि खुली १० चौरस फूट जागा लागते.

शेळ्यांना छताखाली १० चौरस फूट आणि खुली २० चौरस फूट जागा लागते.

पैदाशीचा नराला १५ चौरस फूट जागा छताखाली आणि ३० चौरस फूट खुली जागा लागते.

गोठ्यावरील खर्च हा कोणत्याही प्रकारचे उत्पादन देणारा नसतो. त्यामुळे स्थानिकरित्या उपलब्ध असलेल्या गव्हाचे काड, भाताचा पेंढा, गवत यांचा उपयोग छताकरता केल्यास कमी खर्च लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Theft: केळेवाडीत डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला

Shaktipeeth Highway Project: वाकाव, उंदरगावात ‘शक्तिपीठ’ जीपीएस मोजणीचे काम सुरू

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल दर्शन बारीसाठी ‘पाॅली कार्बोनेट’

White Grub Management: अडीच हजार शेतकऱ्यांनी उभारले प्रकाश सापळे

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक

SCROLL FOR NEXT