Lumpy Scene Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी त्वचा आजारासाठी सातारा जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

सातारा : जिल्ह्यात लम्पी त्वचा या संसर्गजन्य रोगाचा जनावरांमध्ये प्रादुर्भाव झालेला असल्याने संपूर्ण सातारा जिल्हा जनावरांमधील लम्पी त्वचा या रोगासाठी ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घोषित केला असून पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत.

टीम ॲग्रोवन

सातारा : जिल्ह्यात लम्पी त्वचा या संसर्गजन्य रोगाचा (Lumpy Skin Disease Outbreak) जनावरांमध्ये प्रादुर्भाव झालेला असल्याने संपूर्ण सातारा जिल्हा जनावरांमधील लम्पी त्वचा (Lumpy Skin News) या रोगासाठी ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घोषित केला असून पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत.

लम्पी त्वचा रोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करता येईल आणि (गुरे व म्हशी) आणि गोजातीय प्रजातींमधील इतर सर्व प्राणी यांना ज्या ठिकाणी ते पाळले जातात त्या ठिकाणापासून उक्त नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास तसेच कोणत्याही व्यक्तीस, उक्त बाधित गोजातीय प्रजातीचे जिवंत अथवा मृत प्राणी, कोणत्याही उक्त बाधित झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यापासूनचे अन्य कोणतेही उत्पादन उक्त नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास त्याचबरोबर कोणत्याही गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती आयोजित करणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे यास मनाई राहील.

उक्त नियंत्रित क्षेत्रांमधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी उक्त बाधित झालेल्या गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास मनाई राहील. प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्ह्यातील ज्या भागातील पशुपालकांचे गोजातीय व म्हैस जातीय प्रवर्गातील जनावरांना लम्पी त्वचा रोगाची लागण झाल्याचे निष्कर्ष होकारार्थी येतील अशा ठिकाणापासून ५ किलोमीटर त्रिजेच्या परीघामधील सर्व संक्रमित न झालेले जनावरांचे लसीकरण (रिंग व्हॅक्सिनेशन) त्वरित करून रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Executive Editor of Agrowon: ‘ॲग्रोवन’च्या कार्यकारी संपादकपदी रमेश जाधव

Tribal Development: आदिवासींच्या विकासासाठी मत्स्य व्यवसायाला चालना

Land Measurement Irregularities: मोजणीत गैरव्यवहार केल्यास परवाना रद्द होणार

Summer Crop Sowing: उन्हाळी हंगाम पेरण्यांना वेग

Hingoli Turmeric Market: हिंगोलीमध्ये हळदीची २२८० क्विंटल आवक

SCROLL FOR NEXT