Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सरपंचाचे स्वखर्चातून ५०० जनावरांना लसीकरण

‘लम्पी स्कीन’ आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात या आजारावर लागणारे लसीकरणाची औषधी उशिरा पोहोचल्याने हा आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः राज्यभरात ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) वाढत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आपले गाव या आजारापासून सुरक्षित राहावे यासाठी कर्तव्य समजून सिंदखेड लपाली (ता. मोताळा) येथील सरपंच अप्पा कदम यांनी स्वखर्चातून लसीकरणासाठी (Lumpy Skin Vaccination) औषधे आणून सिंदखेड व लपाली येथील ५०० जनावरांचे लसीकरण करून घेतले.

‘लम्पी स्कीन’ आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात या आजारावर लागणारे लसीकरणाची औषधी उशिरा पोहोचल्याने हा आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत आता लसीकरण करण्यात येत असले तरी आता हा आजार आटोक्यात आणण्याचे आव्हान आहे.

मोताळा तालुक्यात काही ठिकाणी जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. लम्पी स्कीन रोगामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. हे लक्षात घेत सरपंच अप्पा कदम यांनी स्वतः ही लस आणून पाचशे जनावरांना टोचून घेतली.

पशुधन विकास अधिकारी डॉ. डिगांबर जुंदाळे, डॉ. धिरज अनिल सोनटक्के, डॉ. चोपडे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले. लसीकरणासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. पशुसेवक अनिल लेनेकर (धामणगाव बढे), मंगेश काळंके (सारोळा मारोती), विनोद इंगळे (लपाली) यांनीही मोफत सेवा दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohit Pawar On Ajit Pawar: '...तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते'; रोहित पवार विधानसभेत काय म्हणाले?

Cotton Market Rate: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, कापूस, पपई, मका आणि केळीचे बाजारभाव

Maize Procurement: सांगोल्यात २१ हजार क्विंटल मका खरेदीविना पडून

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

Supreme Court verdict: २०१८ पूर्वीची बंद झालेली जमीन अधिग्रहण प्रकरणे पुन्हा उघडता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT