काळजी पशुधनाची

लेंडीखताची तपासणी कशी कराल ?

जंत प्रादुर्भाव झालाय की नाही याच्या तपासणीसाठी शेळ्या-मेंढ्यांच्या लेंडीचे नमुने दोन प्रकारे घेता येतात.

Team Agrowon

ठराविक दिवसांच्या अंतराने शेळ्यांचे जंत निर्मुलन केलं पाहिजे, याबद्दलची माहिती आपण मागील भागात पहिली. पण जंत निर्मुलनाचे औषध दिल्यानंतर ते प्रभावी ठरतंय की नाही याची तपासणी देखील तितकीच महत्त्वाची आहे.

जंत प्रादुर्भाव (worm infestation) झालाय की नाही याच्या तपासणीसाठी शेळ्या-मेंढ्यांच्या लेंडीचे नमुने दोन प्रकारे घेता येतात. पहिली तर कळपातील प्रत्येक शेळी-मेंढीची लेंडी (goat manure) वेगवेगळी गोळा करावी किंवा कळपातील शेळ्या-मेंढ्यांची लेंडी एकत्रित गोळा करावी.

पहिल्या पद्धतीमध्ये प्रत्येक शेळीच्या गुदद्वारातून चार ते पाच लेंड्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वेगवेगळ्या गोळा करून घ्याव्यात. प्रत्येक पिशवीवर शेळीचा ओळख क्रमांक लिहून ठेवावा.

दुसऱ्या पद्धतीमध्ये कळपातील प्रत्येक शेळी-मेंढीच्या कानात ओळख क्रमांक नसल्यास, प्रत्येक शेळीची लेंडी वेगवेगळी गोळा करून ओळखणे अवघड जाईल. अशा वेळी लेंडी एकत्रित गोळा करणे सोईचे जाते. एकत्रित लेंडी गोळा करताना कळपातील एकूण शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येच्या अंदाजे ३० टक्के शेळ्या-मेंढ्यांची अंदाजे प्रत्येकी २ ग्रॅम लेंडी गुदद्वारातून काढून एकाच बाटलीमध्ये किंवा पिशवीमध्ये एकत्रित भरावी.

बाटलीवर किंवा पिशवीवर मालकाचे नाव व पत्ता नोंद करावा. लेंडी काढण्यासाठी निवडलेल्या शेळ्या-मेंढ्यांमध्ये प्रामुख्याने आजारी, कळपातून मागे राहणाऱ्या, हगवण लागलेल्या शेळ्या-मेंढ्यांचा समावेश असावा.

लेंडी तपासणीसाठी देताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात-

- शेळ्यांच्या गुदद्वारातून लेंडी काढताना अगोदर हात पाण्यात भिजवावा.

- लेंडी काढणाऱ्याच्या बोटांना नखे असू नयेत.

- कळपातील सर्व शेळ्या-मेंढ्यांची लेंडी काढून झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

- लेंडी काढल्यानंतर ती त्याच दिवशी प्रयोगशाळेत न्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT