Livestock Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Insurance : पशुधनाचा एक ते तीन रुपयात विमा उतरवा ; सदाभाऊ खोत यांची मागणी

Sadabhau Khot : शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीकविमा ही महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. याच धरतीवर राज्यात पशुधन विमा योजना राबविण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Team Agrowon

Livestock Insurance Maharashtra : शिंदे फडणवीस सरकारने आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीकविमा ही महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.

याच धरतीवर राज्यात पशुधन विमा योजना राबविण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

राज्यात एक ते तीन रुपयामध्ये पशुधनाचा विमा उतरवावा, अशी मागणी खोत यांनी केली आहे. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे खोत यांनी ही मागणी केली आहे.

राज्यात दूध दरातील घसरणीमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या दुधाला मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. दूध दराच्या प्रश्नावरून रयत क्रांती संघटनेने दूध परिषदही घेतली होती. दूध दराबाबात तत्काळ बैठक घ्यावी, यासाठी निवेदनही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी पुण्यात बैठक घेतली.

या बैठकीत सदाभाऊ खोत यांनी केलेल्या मागणीबाबात राज्य सराकर सकारात्मक असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. तसेच विमा योजनेच्या मार्फत राज्य सरकार पशुधनाचे दायित्व स्विकारेल, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

लम्पीचा दुसरा डोस मोफत

दरम्यान, राज्यात लम्पी स्किन आजारामुळे पशुधान मृत्युमुखी पडले होते. लम्पीमुळे पशुपालकांवर आर्थिक संकट ओढावले होते. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनावरांनी लसीचा दुसरा डोस मोफत देण्यात येणार आहे.

दुधाला ३५ रुपये लिटरचा दर

दरम्यान, या बैठकीत राज्यातील दूधाचा दर हा एक सारखा असावा. तसेच दुधाला ३५ रुपये दर द्यावा, अशी भूमिका विखे पाटील यांनी घेतली आहे. तसेच दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन आणि एफडीए यांना सोबत घेवून संयुक्त समिती गठित करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

गायीच्या ७५ तर म्हशीच्या दुधाला १२५ रुपेय लिटर भाव

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंदापूर येथील वरकुटे बुद्रूक येथे एका शेतकरी मेळाव्यात बोलताना गायीच्या दुधाला ७५ रुपये तर म्हशीच्या दुधाला १२५ रुपये प्रतिलिटर दर द्यावा, अशी मागणी खोत यांनी केली होती. तसेच देशी दारूच्या क्वार्टरची किंमती जेवढी आहे तेवढा दर शेतकऱ्यांच्या दुधाला द्या, अशी अजब मागणी सदाभाऊ खोत यांनी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT