Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry : ‘पशुसंवर्धन’च्या सेवा लोकाभिमुख होण्याकरिता सुधारणा आवश्यक

राज्यातील पशुधनास झालेल्या लम्पी स्कीन आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत लम्पीच्या रुग्णांमध्ये घट होत आहे.

टीम ॲग्रोवन 

मुंबई : पशुसंवर्धन विभागाच्या (Animal Husbandry Department) सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि त्या तत्परतेने व पूर्ण कार्यक्षमतेने पुरविण्यासाठी विभागाच्या काही संस्था आणि कार्यालयांमध्ये संरचनात्मक सुधारणा करणे आणि संस्था, कार्यालयांच्या पदांचा आकृतिबंध सुधारित करणे आवश्यक असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी सांगितले.

राज्यातील पशुधनास झालेल्या लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या आकृतिबंधाविषयी मंत्रालय येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सह सचिव माणिक गुट्टे, सह आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील पशुधनास झालेल्या लम्पी स्कीन आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत लम्पीच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. परंतु बुलडाणा जिल्ह्यात प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्ष राहावे.’’ यासाठी मनुष्यबळ कमी पडू दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

बैठकीत या विषयांवर चर्चा, प्रस्ताव मागवले...

- तालुका स्तरावर कार्यरत तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय संस्थांची कार्यात्मक संरचना सुधारणे.

- जिल्हा परिषद अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ व २ यांच्या मंजूर पदांमध्ये समान आकृतिबंधानुसार सुसूत्रता आणणे.

- राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी -१ व श्रेणी २ जिल्हा परिषदांकडे वर्ग करणे.

- जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेले फिरते पशुवैद्यकीय दवाखाने बंद करणे.

- पशुधन विकास अधिकारी गट ब (राजपत्रित) यांच्या पदांची स्थाननिश्चिती करणे.

- सघन कुक्कुट विकास गट या संस्था जिल्हा परिषदांकडून पशुसंवर्धन विभागाकडे पुन्हा वर्ग करून घेणे.

- प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद या कार्यालयांचे बळकटीकरण करणे.

- पशुसंवर्धन विभागातील गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे निरसीत घोषित करणे.

- सेवा कंत्राटी पद्धतीने उच्च शिक्षित व स्थानिक कर्मचारी यांच्याकडून उपलब्ध करून जास्त कार्यक्षम सेवा देणे शक्य होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT