Fodder  Agrowon
काळजी पशुधनाची

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कडबा उपलब्ध आहे. किंवा मुरघास उत्पादक व्यक्ती वा संस्था असतील, त्यांच्या नावाची यादी तहसील आणि पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेश पशूसंवर्धन आयुक्त दिवेगावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Dhananjay Sanap

राज्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. पाणी टंचाईसोबत चारा टंचाईची समस्याही गंभीर होऊ लागली आहे. चारा टंचाईतून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी चारा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याबाबत २९ एप्रिल रोजी पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात पावसानं दडी मारली होती. त्यामुळे राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकरी हैराण आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात ज्या पशूपालकांकडे स्वत:च्या मालकीची जमीन नाही, अशा पशुपालकांना चारा टंचाईची समस्या भेडसावत होती. परंतु प्रत्यक्षात चारा उपलब्ध असून चारा खरेदी-विक्रीसाठी परिपूर्ण असा बाजार उपलब्ध नव्हता. त्यामुळे चारा खरेदी आणि विक्रीसाठी जिल्ह्यात अडचणी येत होत्या.  

राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कडबा उपलब्ध आहे. किंवा मुरघास उत्पादक व्यक्ती वा संस्था असतील, त्यांच्या नावाची यादी तहसील आणि पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेश पशूसंवर्धन आयुक्त दिवेगावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनानं ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी चारा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांची सविस्तर यादी तयार करावी. त्या यादीत तालुक्याचं नाव, संस्थेचं नाव, पशुपालकाचं नाव, गाव, मोबाइल नंबर, चारा प्रकार, अंदाजे दर, आणि चारा उपलब्धतेची अंदाजे आकडेवारी आदि माहिती द्यावी, अशी सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे.   

दरम्यान, राज्यात बहुतांश जिल्ह्यात चारा टंचाईचं संकट गंभीर स्वरूप धारण करू लागलं आहे. त्यामुळे चारा छावणी सुरू करण्याची पशूपालक मागणी करत आहेत. चारा टंचाईआड चारा छावणीची मागणी रेटत त्या आडून पुरवठादार लॉबीकडून गैरव्यवहाराला प्रोत्साहन दिलं जात असल्यानं पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना 'डीबीटी'च्या माध्यमातून चारा अनुदान देण्याची चर्चा सुरू होती. परंतु लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत डीबीटीचा प्रस्ताव अडकून पडल्याचं बोललं जात आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT