Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नुकसानग्रस्त पशुपालकांना अर्थसाह्य द्या

टीम ॲग्रोवन

अमरावती : ‘‘लम्पी स्कीन (Lumpy Skin) प्रतिबंधक लसीकरण (Lumpy Vaccination) राज्‍यात व्यापक प्रमाणात सुरू आहे. पशुधनाच्या (Livestock) मृत्युत घट होत आहे. विभागात लसीकरणाचा वेग वाढवून कार्यवाही पूर्ण करावी. त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ अर्थसाह्य मिळवून द्यावे,’’ असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe Patil) पाटील यांनी शनिवारी (ता.१) दिले.

विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांची विभागस्तरीय आढावा बैठक महसूलभवनात झाली. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित होते.

विखे-पाटील म्हणाले, ‘‘ लम्पी स्कीनमुळे अमरावती विभागात मृत पशुधनाची संख्या ६५५ आहे. अमरावती जिल्ह्यात १६३ जनावरे दगावली. या आजाराच्या प्रादुर्भावाने गाय मृत झाल्यास ३० हजार, बैल मृत झाल्यास २५ हजार व वासरू दगावल्यास १६ हजार रुपये अर्थसाह्य,

त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सेस फंडातून १० हजार रुपये देण्याची तरतूद शासनातर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्तावाची कार्यवाही गतीने करावी. पुढील आठ दिवसांत विभागातील नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ ही मदत द्यावी. ’’

‘‘अतिवृष्टिबाधितांना आवश्यक अर्थसाह्यासाठी निधी देण्यात येत आहे. तथापि, अनेक ठिकाणी घरांची पडझड, जनावरांचे नुकसान आदींबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव देऊन कार्यवाही पूर्ण करावी,’’ असेही विखे-पाटील यांनी सांगितले.

‘कुक्कुटपालकांच्या अडचणी सोडविणार’

अमरावती : ‘‘पोल्ट्री व्यवसाय हा स्वयंरोजगार मिळवून देणारा महत्त्वाचा व्यवसाय आहे. याद्वारे अधिकाधिक रोजगार निर्मिती व विकास साधण्यासाठी कुक्कुटपालकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील,’’ असे प्रतिपादन महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केले.

अंजनगाव बारीनजिक रविवारी (ता. २) आयोजित कुक्कुटपालक मेळावा, तसेच आधुनिक कुक्कुटपालन केंद्राचा (विदर्भातील सर्वात मोठे स्वयंचलित लेअर फार्म) प्रारंभ विखे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT