Pet  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : पाळीव प्राण्यांमधील उष्माघात टाळा

Heat Stroke Remedy : पाळीव प्राण्यांना स्वतःच शारीरिक तापमान आणि बाहेरील तापमान यात समायोजन करताना थोडा जास्त त्रास होतो. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

Team Agrowon

डॉ. अनुष्का विश्‍वनाथ, डॉ. वर्षा थोरात

Heatstroke in Pet : आपल्या घरातील श्‍वान, मांजरांना देखील उष्णतेचा मोठा त्रास होतो. पाळीव प्राण्यांच्या शरीरावर केसांचे भले मोठे आवरण असते. त्यामुळे त्यांना स्वतःच शारीरिक तापमान आणि बाहेरील तापमान यात समायोजन करताना थोडा जास्त त्रास होतो. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८ ते ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढलेले असते. वाढलेल्या तापमानाचा जेवढा त्रास माणसांना होतो, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त त्रास प्राण्यांना होतो. आपल्या घरातील श्‍वान, मांजरांना देखील उष्णतेचा मोठा त्रास होतो. पाळीव प्राण्यांच्या शरीरावर केसांचे भले मोठे आवरण असते.

माणसांप्रमाणे प्राण्यांमध्ये धर्म ग्रंथी संपूर्ण शरीरावर नसतात. त्यामुळे त्यांना स्वतःच शारीरिक तापमान आणि बाहेरील तापमान यात समायोजन करताना थोडा जास्त त्रास होतो. या दोनही गोष्टींचा एकत्रित परिणाम उन्हाळ्यातील आरोग्यावर होतो.

अंगावर पिसवा, गोचिड अशा परजीवींचे प्रमाण वाढलेले दिसते. शरीरावर पिसवा असतील, तर फ्ली अल्लेर्जिक डर्माटायटीस आढळून येतो. या आजारात शरीरावर पिसवा असणे, त्यांची अंडी असणे आणि प्रचंड प्रमाणात शरीराला खाज येणे अशी लक्षणे आढळून येतात. अंगावर लाल चट्टे उठतात, बुरशीजन्य आजार होतो, केस गळतात.

अंगावर गोचिड असल्यास गोचिड ताप होण्याचा संभाव्य धोका असतो. मार्च ते ऑगस्ट महिन्यांत गोचिड ताप आजार पसरतो. शरीरावर असणाऱ्या या परजीवींमुळे उष्माघाताचा धोका वाढतो.

उन्हाची दाहकता वाढल्यावर उष्माघात ही अतिशय वेगाने घडणारी प्रक्रिया आहे. उष्माघातामुळे पाळीव प्राण्यांच्या शरीराचे तापमान १०६ अंश फॅरनहाइटपर्यंत किंवा त्याहून अधिक प्रमाणात वाढते. तापमानात अचानक झालेली वाढ थेट शरीराच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करते. यामुळे प्राण्यांना आकडी देखील येते.

शारीरिक तापमानाचे नियमन करताना प्राण्यांचा श्‍वसोच्छ्वास कमालीचे वाढतो, तोंडातून फेस येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आणि झपाट्याने कमी होते. उलट्या, जुलाब ही लक्षणे डीहायड्रेशनला कारणीभूत ठरतात. उष्माघाताची तीव्रता वाढवितात.

उष्माघाताच्या परिस्थितीमध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते. शरीरातील महत्त्वाचे अवयव काम करणे कमी करतात.

उपाययोजना

उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित पाळीव प्राण्यांच्या इस्पितळात घेऊन जावे. बर्फाचा शेक देऊन शारीरिक तापमान कमी करावे. पुरेसे पाणी पाजावे.

जेव्हा तापमान कमाल असेल तेव्हा त्या वेळेस खाद्य देणे टाळावे.

पाळीव प्राण्याच्या खाद्यामध्ये थंड पदार्थांचा समावेश करावा. उदा. दही, ताक. आठवड्यातून एकदा व्हॅनिला आइस्क्रीम द्यावे. या पदार्थांचे प्रमाण योग्य आणि आपल्या प्राण्याच्या वजनाच्या तुलनेत असावे.

चिकन ब्रॉथ, भाज्यांचा ब्रॉथ पदार्थांचा समावेश खाद्यामध्ये करावा.

बर्फाचे तुकडे खेळायला, चाटायला द्यावेत.

श्‍वान, मांजराची जागा ही तुलनेने थंड, सावलीच्या ठिकाणी आणि हवेशीर ठेवावी.

पिसवा, गोचिडीचे नियंत्रण करावे.

डॉ. वर्षा थोरात ८७७९२२७२६२

(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT