Fodder Processing  Agrowon
काळजी पशुधनाची

Fodder Processing : युरिया प्रक्रियेतून निकृष्ट चाराही बनतो पौष्टिक

बीड जिल्ह्यातील गेवराईचे ज्येष्ठ शेतकरी कृष्णराव काळे गेल्या २० वर्षापासून चारा प्रक्रिया करतात. जेंव्हा चारा प्रक्रियेविषयी फारशी कुणाला माहितीही नव्हती तेव्हापासून काळे निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करतात. त्यामुळे काळेंचा चारा प्रक्रियेवर चांगला अभ्यास आहे.

Team Agrowon

उन्हाळ्यात दरवर्षी दुग्धव्यावसायिकांना चारा टंचाईचा (Fodder Defect) सामना करावा लागतो. चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्यावर किंवा पिकाच्या अवशेषावर प्रक्रिया (Fodder Processing) करुन ते जनावरांसाठी चारा म्हणून वापरा असं नेहमी कृषी विभाग, पशुतज्ज्ञ सांगतात.

मात्र कुणी त्यावर फारसा विचार करत नाही किंवा ते आमलातही आणत नाही. पिकाच्या काढणीनंतर मिळणारा गव्हाचा भुसा, मका- ज्वारीचं काड, तूर - सोयाबीनच भुसकट सरळ जाळून टाकल जात किंवा तसचं जनावराला खाऊ घातलं जात.

पण या वाया जाणाऱ्या पिकाच्या अवशेषावर प्रक्रिया (Crop Residue) करुन उत्कृष्ट प्रतीचा चारा बनतो. जो जनावरांसाठी अतीशय पौष्टिक आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईचे ज्येष्ठ शेतकरी कृष्णराव काळे (Krushnarao Kale) गेल्या २० वर्षापासून चारा प्रक्रिया करतात.

जेंव्हा चारा प्रक्रियेविषयी फारशी कुणाला माहितीही नव्हती तेव्हापासून काळे निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करतात. त्यामुळे काळेंचा चारा प्रक्रियेवर चांगला अभ्यास आहे. 

६८ वर्षीय काळे कृषी पदवीधर आहेत. नोकरी न करता ते पुर्णवेळ त्याची २५ एकर शेती सांभळतात.

जोडीला ६ दुभती जनावरही आहेत. आभ्यासू वृत्तीमुळे काळे अतीशय प्रयोगशील शेतकरी आहेत. संशोधन करुन सतत शेतीत प्रयोग करत असतात.

२० वर्षापुर्वी उत्तर प्रदेशातील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेला भेट दिल्यानंतर त्यांना चारा प्रक्रियेविषय़ी माहिती मिळाली.

तेव्हापासूनच त्यांनी चाऱ्यावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. ते मका, ज्वारी, गहू, सोयाबीन, तूर अशी पिके असतात.

या पिकापासून मिळणाऱ्या भुसकट, काडावर युरिया प्रक्रिया केली जाते. त्यामुळे त्यांना कितीही चारा टंचाई असली तरी चारा कमी पडत नाही. 

काड किंवा भुश्यावर सेल्युलोजचे कठीण अवरण असल्यामुळे असा चारा जनावरांना पचायला जड असतो.

युरिया प्रक्रियेमुळे चाऱ्यावरील सेल्युलोजचे कठीण आवरण तुटल्यामुळे चारा मऊ होतो. चाऱ्याची पचनीयता वाढते.

चाऱ्यातील प्रथिनांच प्रमाण अर्धा टक्क्यांपासून अडीच टक्क्यांपर्यंत वाढत. मीठ तसच खनीज मिश्रणामुळे चाऱ्याची चव वाढते. त्यामुळे असा प्रक्रियायुक्त चारा जनावरे आवडीने खातात. 

युरिया प्रक्रिया कशी केली जाते?

गहू, मका, सोयाबीन, ज्वारी, तूर यासारखे जे उपलब्ध असेल त्या पिकाचे काड किंवा भूश्याचा दोनशे चौरस फुटाच्या रूंद जागेत दोन फूट उंचीचा थर लावावा. 

मका, ज्वारीच्या काडाची कुट्टी करुन मगच प्रक्रियेसाठी वापर केला जातो. २०० लिटर पाण्यात ४ किलो युरीया, २ किलो मिठ आणि १ किलो खनीज मीश्रण चांगल विरघळून घ्यावं.

यातील २० लिटर द्रावण भुशाच्या थरावर एकसारख शिंपून  व्यवस्थित मिसळाव. त्यानंतर द्रावणयुक्त भुसा मिश्रण पायाने चांगल चोपून या मिश्रणातील हवा पुर्णपणे काढून टाकावी. 

असे दोन फूटाचे थर एकावर एक लावावेत. या थरावर ताडपत्री झाकून हे मिश्रण पुढे २० दिवस ताडपत्रीत हवाबंद स्थितीत ठेवावं. हवाबंद स्थितीत चाऱ्यावर युरिया मुळे अमोनियाची प्रक्रिया होते. 

२० दिवसानंतर चारा बाहेर काढावा. चाऱ्यामध्ये तयार झालेला अमोनीया वायू हवेत निघून जाण्यासाठी चारा बाहेर काढून मोकळ्या हवेत ठेवावा. त्यानंतरच तो जनावरांना खाऊ घालावा. 

युरिया प्रक्रिया केलेला चारा एक वर्षाच्या आतील वासरांना खायला देऊ नये कारण त्याची तेवढी पचनक्षमता नसते.असा चारा तीन ते चार किलोप्रमाणे जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत द्यावा. 

भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी चारा प्रक्रिया हा चांगला पर्याय आहे. असा चारा टंचाईकाळात पुरविल्यास 

निश्‍चितच दूध उत्पादन टिकून जनावरांच्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करता येईल असं काळे सांगतात.

अधिक माहितीसाठी कृष्णराव काळे यांना  ९६०४७५४६९९ या नंबरवर संपर्क करावा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT