Goat Rearing  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Health Management : शेळ्यांच्या आरोग्याकडे द्या लक्ष...

Team Agrowon

डॉ. कल्याणी सरप, विशाल हांडे

Goat Farming : शेळीपालन व्यवस्थापनात सर्वांत जास्त काळजी ही गोठ्यात असणारी आर्द्रता कमी करण्यासाठी घ्यावी लागते, कारण शेळ्यांना आर्द्रता सहन होत नाही. त्यामुळे त्यांना श्‍वसनसंस्थेचे आजार होण्याची दाट शक्यता असते.

जंताचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कळपातील सर्व शेळ्यांना जंतुनाशकाची मात्रा द्यावी. गोचीड शरीरातील रक्त शोषतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. अंगावर खाज सुटते. शेळ्या बैचेन होतात, खाणे बंद करतात, हालचाल मंदावते. हे लक्षात घेऊन गोचीड नियंत्रणावर लक्ष द्यावे. खास तयार केलेल्या खाड्यामधून शेळ्यांना गोचीडनाशक पाण्याने धुऊन घ्यावे.

शेळ्यांना आर्द्रता अजिबात सहन होत नाही म्हणूनच गोठ्यातील आर्द्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी शेगडी लावावी किंवा ६० वॉट क्षमतेचा बल्ब रात्रभर लावून ठेवावा.

गोठा कोरडा ठेवावा. गोठ्यातील जमीन जर ओली असेल तर शेळ्यांच्या पायाच्या खुरामध्ये ओलसरपणा राहून फोड येतात. यामुळे शेळ्या लंगडतात, ताप येतो, चारा कमी खाते, अशक्त होतात, दुर्लक्षित राहिल्यास मृत्यू पावतात.

पावसात शेळी भिजली की न्यूमोनिया होतो. यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते इत्यादी लक्षणे दाखविते. या आजारावर उपचार महाग असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून आजार होणार नाही याची काळजी घ्यावी.

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या अभावी झालेली उपासमार आणि पावसानंतर उगवलेला हिरवा चारा शेळ्या जास्त प्रमाणात खातात. या कोवळ्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात, त्यामुळे अपचन होते. पोटफुगी, हगवण यांसारखे आजार होतात. पोटफुगीच्या नियंत्रणासाठी गोडे तेल आणि खाण्याचा सोडा पाजला तर पोटफुगी कमी होते. पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने हगवणीवर उपचार करावेत.

पावसाळ्यात शेळ्यांची खरेदी करू नये, कारण पावसाळ्यात आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जर गरज भासली तर ज्या भागातून शेळ्या खरेदी करावयाच्या आहेत तेथे आजाराचा प्रादुर्भाव झालेला नसावा.

पावसाळ्यात शेळीपालकांनी चारा उपलब्ध होण्यासाठी झाडे, झुडपे आणि गवताची लागवड करावी. सर्वसाधारणपणे दोन शेळ्यांसाठी एक झाड पुरसे होते.

आजारांचे नियंत्रण

लाळ्या खुरकूत : हा आजार विषाणूमुळे होतो. याचा प्रादुर्भाव कळपात लवकर होतो. या आजारावर प्रतिबंधक उपायाशिवाय उपचार नाही हे लक्षात घेऊन लसीकरण महत्त्वाचे आहे.

घटसर्प, फऱ्या : पावसाळ्यात या आजारांचा प्रादुर्भाव दिसतो. या आजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. यामुळे उपचारांवर होणारा खर्च टाळता येते.

धनुर्वात : पावसाळ्यात धनुर्वाताचा प्रादुर्भाव होतो, यासाठी वेळेवर लसीकरण आवश्यक आहे.

डॉ. कल्याणी सरप, ९०९६८७०५५० (कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, जि. गोंदिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nuksan Bharpai : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारने दिली २३७ कोटींच्या मदत निधीला मंजुरी

Water Projects : चाळीसगावातील नऊ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

Sugar Factory : ‘वसाका’ वार्षिक भाडेकराराने चालवणार

Revenue Department : दीडशे गावांची जबाबदारी अवघ्या १२ तलाठ्यांवर

Water Scarcity : टॅंकरला विश्रांती, पण टंचाईचे ढग कायम

SCROLL FOR NEXT