Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : पावसापूर्वी ५० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण

Animal Care : शिराळा तालुक्यात अपुरे कर्मचारी असतानाही पशुसंवर्धन विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी जनावरांचे घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार प्रतिबंधक लसीकरण ५० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यात अपुरे कर्मचारी असतानाही पशुसंवर्धन विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी जनावरांचे घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार प्रतिबंधक लसीकरण ५० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

विशेषतः वारणा काठच्या पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या २२ गावांतील जनावरांचा यात समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या लम्पी स्कीन व ब्रुसेल्लाचे लसीकरण सुरू झाले आहे. कमी कर्मचारी असतानाही तारेवरची कसरत करत लसीकरण मोहीम सुरू आहे.

गतवर्षी वेळेत लम्पी स्कीनचे १०० टक्के लसीकरण केल्याने सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत शिराळा तालुक्यात केवळ सात टक्के जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली होती. त्यात फक्त ८३ जनावरांचा मृत्यू झाला होता.

सर्वांना भरपाई मिळाली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने ‘नो सुट्टी ओन्ली ड्युटी’ असे म्हणत काम केले होते. वेळेत लसीकरण केल्याने लम्पी स्कीनची साथ आटोक्यात आणण्यास मदत झाली होती.

शिराळा तालुका डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. येथे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गायी व म्हशी पालन केले जाते. तालुक्यात जवळपास २६ हजार ३६९ गाय वर्ग संख्या आहे. तालुक्यात १९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.

एक फिरता दवाखाना असला तरी कर्मचाऱ्यांअभावी तो बंद आहे. केवळ एक कर्मचारी असल्याने ते इतरांना कामात सहकार्य करत आहेत. गाडी व चालकाअभावी फिरती करता येत नाही.

सध्या लसीकरणाच्या मोहिमेत पशुधन विकास अधिकारी आठ, सहायक पशुधन विकास अधिकारी सहा, पशुधन पर्यवेक्षक चार यामध्ये १८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अद्याप पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांच्या ९ जागा रिक्त आहेत.

उपलब्ध लसी

घटसर्प १८४००

फऱ्या ८९००

लम्पी स्कीन २२६००

अंत्रविषार २५००

घटसर्प व फऱ्या ५६४०

तालुक्यातील पशुधन

गायी २५६९१

म्हशी ४४३३६

शेळ्या ६८३५

मेंढ्या १७४६

आपले पशुधन सुरक्षित रहावे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गाईंना लम्पी स्कीन व ४ ते ८ महिन्यांच्या कालवड व रेडीला ब्रुसेल्लाचे लसीकरण करून घ्यावे. आपल्या पशुधनास होणारा संभाव्य धोका टाळावा.
- डॉ. सतीश जाधव, पशुधन विकास अधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT