Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांतील आजारावर औषधी वनस्पतींचे उपचार

Medicinal Plants Treatment : जनावरांच्या दैनंदिन व्यवस्थापनात किंवा आजारांवर उपचार करताना घरगुती पद्धतीने वनौषधींचा वापर केल्यास खर्च कमी करता येतो.

Team Agrowon

डॉ. संदीप ढेंगे, डॉ. गंगाप्रकाश चन्ना
Dairy Animal Treatment :
जनावरांच्या दैनंदिन व्यवस्थापनात किंवा आजारांवर उपचार करताना घरगुती पद्धतीने वनौषधींचा वापर केल्यास खर्च कमी करता येतो. मात्र सांसर्गिक आजाराची तीव्र लक्षणे असलेल्या जनावरांवर पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावेत.

अतिसार आजार ः
१) निकृष्ट किंवा खराब, बुरशीजन्य चारा किंवा खाद्य जनावरांनी खाल्ल्यास पोटात अपचन होऊन जनावरांना हगवण लागते. हगवण ३ दिवसांपेक्षा अधिक दिवस असल्यास शरीरातील पाणी आणि इतर शारीरिक पोषक कमी होऊन जनावरे अशक्त व कमजोर होतात.
उपचार ः
१) एक ओंजळ चांगले बारीक दळलेले कोवळे डाळिंब, पेरू, कडुनिंबाची पाने, ५० ग्रॅम सुंठ पावडर आणि १०० ग्रॅम गूळ या मिश्रणाच्या बोराच्या आकाराच्या गोळ्या तयार कराव्यात.
२) ३ गोळ्या एकावेळेस याप्रमाणे दिवसातून ३ वेळा हगवण बरी होईपर्यंत जनावरांना खायला द्यावेत.
३) जनावराच्या शरीरातील पाणी कमी झाले असल्यास पाणी, साखर व मीठ यांचे द्रावण पाजावे.

गोचीड नियंत्रण ः
१) जनावरांना गोचीड ताप येतो. शारीरिक वाढ खुंटून जनावर बारीक दिसते. दुधाळ जनावरांच्या दुग्ध उत्पादनात लक्षणीय घट होते.
उपचार ः
१) प्रत्येकी २० ग्रॅम आले, तुळस, कडुनिबांची पाने, हळद पावडर आणि सीताफळाच्या बिया एकत्रितपणे चांगल्या बारीक करून २५० मिलि. कडुनिबांच्या तेलात उकळावे आणि थंड झाल्यावर तयार मिश्रण जनावरांच्या शरीराला लावावे.

विषबाधा :
१) जनावरे कुरणांवर चरताना काही विषयुक्त पदार्थ किंवा विष खाल्ल्यामुळे विषबाधा होते आणि वेळीच योग्य उपचार नाही मिळाल्यास जनावरे दगावतात. सौम्य स्वरूपाच्या विषबाधेवर घरगुती उपचार करता येतात.
उपचार ः
१) १० ग्रॅम विड्याची पाने, तुळशीची पाने, काळी मिरी व सुंठ एकत्रित बारीक करून कोमट पाण्यात मिसळून जनावरांना त्वरित पाजावे.
२) विषबाधा तीव्र स्वरूपाची असल्यास ताबडतोब पशुवैद्यकीय उपचार करावे.

वंध्यत्व :
१) गायी-म्हशी वांझ राहतात किंवा माजावर येत नाहीत किंवा वारंवार माजावर येतात किंवा काही जनावरांचा माज मुका असतो.
उपचार ः
१) कोरफडीचे ३ पाने उपाशापोटी ३ दिवस खायला द्यावीत. सोबतच कोंब आलेले हरभरा किंवा बाजरी किंवा गहू १५ दिवस वंध्यत्व असलेल्या जनावरांना खाऊ घालावेत. जर १५ दिवसांनी जनावर माजावर आल्यास फळविण्याच्या अगोदर १५० मिलि कडुनिबांचे तेल पाजावे.

वार न पडणे :
१) गाय, म्हैस व्याल्यानंतर ३ ते ४ तासांत गर्भाशयातून वार पडणे हे विण्याची क्रिया बरोबर झाली याचे प्रमुख लक्षण आहे. परंतु काही वेळा गर्भाशयात वार अडकून राहते किंवा अर्धवट बाहेर लोंबकळत राहिल्याने वार गर्भाशयात सडण्याची प्रक्रिया सुरू होते.
२) गर्भाशयात जंतुसंसर्ग होऊन जनावरांच्या उत्पादन आणि प्रजोत्पादन क्रियांवर भविष्यात विपरीत परिणाम होतो. अर्धवट बाहेर लोंबकळलेल्या वाराला ओढाताण करू नये. वाराच्या बाहेरील टोकाला कुठलीही जड वस्तू बांधू नये. कुत्री वाराला ओढाताण करणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
उपचार ः
१) जर वार चार तासांत बाहेर न पडल्यास तीळ किंवा गोखरूच्या झाडांच्या पानांचा लगदा (३०० ते ४०० ग्रॅम) करून एक लिटर कोमट पाण्यात मिसळून पाजावा.
२) उपचारानंतर १ तासात सुद्धा वार न पडल्यास पशुवैद्यकांना बोलावून वार काढून उपचार करावेत.

मायांग बाहेर येणे :
१) गाई, म्हशींच्या शरिरात संप्रेरकीय असंतुलनामुळे गाभण कालावधी किंवा व्याल्यानंतर लगेचच मायांग बाहेर येते. बाहेर आलेले मायांग लवकर आत न घातल्यास जंतुसंसर्ग होऊन जनावरांचा मृत्यू होतो.
उपचार ः
१) सौम्य प्रकारे मांयाग बाहेर आल्यास सर्वप्रथम स्वत:चे हात जंतुनाशकाच्या द्रावणाने स्वच्छ धुवावे. बाहेर आलेल्या मायांगाला साखरेच्या पाण्याने स्वच्छ करून केळीच्या पानांनी उचलून व्यवस्थित आत घालावे.
२) तोंडाकडे उतार राहील अशा रीतीने जनावरांना काही दिवस बांधावे. २ ओंजळ लाजाळूची पाने बारीक करून २०० मिलि शेळीच्या दुधात मिसळून दिवसातून ३ वेळा ५ दिवस पाजावे.

दूध वाढीसाठी उपाय ः
१) तीन चमचे शतावरीच्या मुळांचा पावडर ३०० ग्रॅम करडईच्या ढेपेत मिसळून १५ दिवस दुधाळ जनावरांना खाद्यात दिल्याने दूध उत्पादनात वाढ होऊन दूध देण्याचा कालावधी वाढतो.
..........................................................................................................
- डॉ. संदीप ढेंगे, ९९६०८६७५३६,
(सहायक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, पशुशरीरक्रियाशास्त्र विभाग,
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT