Poultry Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Management : ब्रॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापन

Broiler Poultry : उष्णतेच्या ताणामुळे ब्रॉयलर कोंबड्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी १८ ते २८ अंश सेल्सिअस हे योग्य तापमान आहे.

Team Agrowon

डॉ. सिद्दीकी एम.एफ.एम.एफ.

Broiler Chicken Poultry Management : उष्णतेच्या ताणामुळे ब्रॉयलर कोंबड्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी १८ ते २८ अंश सेल्सिअस हे योग्य तापमान आहे. ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामध्ये कोंबड्यांमध्ये उष्णतेचा ताण सुरू होतो.

शेड व्यवस्थापन

शेडमध्ये फॉगर्स आणि कूलर सिस्टिमच्या आधारे तापमान नियंत्रण करावे.

शेडमध्ये थेट सूर्यप्रकाश येऊ देऊ नये.

भाताच्या पेंढ्या किंवा ऊस पाचटाचे छतावर आच्छादन केल्याने शेडमधील तापमान कमी होईल.

प्रकाश परावर्तित होण्यासाठी छताला पांढरा रंग लावावा.

शेडभोवती उंच फांद्यांची झाडे लावल्याने तापमान कमी होऊ शकते.

पाणी व्यवस्थापन

कोंबड्यांना भरपूर स्वच्छ आणि थंड पाण्याचा पुरवठा करावा.

संसर्ग नियंत्रित करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सातत्याने तपासणी करावी.

पाण्याच्या टाक्या ओल्या गोणपाटाने झाकून ठेवाव्यात.

पाणी पिण्याची वारंवारता वाढवावी.

पाण्याची पाइपलाइन ओल्या कापडाने झाकून ठेवावी.

आहार व्यवस्थापन

कोंबड्यांना सकाळी आणि संध्याकाळी खाद्य द्यावे.

जीवनसत्त्व क, इ, बी २, बी ६, बी १२ आणि ट्रेस खनिजे यासारखा पूरक आहार द्यावा.

२० ते ३० टक्के अतिरिक्त जीवनसत्त्वे आणि ट्रेस खनिजे आहारात द्यावीत.

कोंबड्यांना पोषक आहार दिल्याने त्यांची कार्यक्षमता सुधारते. पेलेटयुक्त खाद्य द्यावे.

सामान्य व्यवस्थापन

बेडिंग साहित्य २ ते ३ इंच असावे आणि लिटर सातत्याने हलवावे.

उन्हाळ्यात कोंबड्यांना १० टक्के अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी.

शेडमध्ये जास्त गर्दी टाळावी.

वाहतूक आणि लसीकरण फक्त थंडीच्या वेळेत करावे.

शेडमध्ये फॉगर्स वापरल्याने तापमान ५ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल.

डॉ.सिद्दीकी एम.एफ.एम.एफ, ९९६०१४७१७१

(सहायक प्राध्यापक, चिकित्सालयीन पशुवैद्यकीय औषध नीती व न्यायवैद्यक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT