Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ लस मोफत मिळणार

टीम ॲग्रोवन

पुणे ः ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी (Lumpy Skin Disease Control) राज्यात पशुसंवर्धन विभागासह (Department Of Animal Husbandry) इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा (Vaccine Stock) उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची (Livestock) काळजी घेऊन खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. सध्या १० लाख लस मात्रा उपलब्ध असून, तातडीने मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह (Sacchindra Pratap Singh) यांनी मंगळवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत दिली.

तसेच राज्यात आतापर्यंत २ हजार ६६४ गाय म्हशींना लागण झाली असून, १ हजार ५२० पशुधन बरे झाली आहेत. तर ५ लाख १५ हजार १२० पशुधनाला लसीकरण केले आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. पशुसंवर्धन आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘लम्पी स्कीन हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात विविध राज्यांत मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही. पशुसंवर्धन विभागाने युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली असून, १० लाख डोस उपलब्ध असून, विविध जिल्ह्यांना गरजेनुसार पुरवठा सुरू केला आहे.’’

श्री. सिंह यांनी सांगितले, की खासगी पशू वैद्यकीय डॉक्टर लम्‍पी बाधित पशुधनासाठी महागडी प्रतिजैविके आणि इतर औषधे लिहून देत आहेत, तर एलएसडी निर्धारित उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने व तालुका लघू पशू चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. सर्व पशुपालकांनी बाधित पशूंसाठी त्यांच्या दारात मोफत उपचार घ्यावेत. या बाबत काही तक्रार असल्यास विभागाच्या जिल्हा उपायुक्त किंवा खात्याच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, तसेच लम्‍पी चर्मरोगाची लक्षणे दिल्यास दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन उपचार करून घ्यावेत.

दहा लाख लस मात्रा; गतीने लसीकरण

राज्यात लम्‍पी रोगामुळे मृत्युदराचे प्रमाण कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात बाधित क्षेत्रात ५ किलोमीटर परिघातील गायींना लसीकरण करण्यासाठी १० लाख लसमात्रांची खेप प्राप्त झाली आहे. अधिक गतीने लसीकरण करावे व रोग पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावे, अशा सूचना यंत्रणांना दिल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

शेऴ्या-मेंढ्यांचे बाजार सुरू राहणार

‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आणि परिणाम इतर प्राण्यांवर नसल्याने शेळी मेंढ्यांचे बाजार सुरू करण्याबाबत संबंधित विभागाना सूचना दिल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

‘लम्पी स्कीन’मुळे पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. तसेच मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १८००-२३३०-४१८ अथवा राज्यातील कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ वर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता

राज्यातील ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी १ हजार १५९ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आल्याचे देखील आयुक्त सिंह यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्‍ह्याला १ कोटी रुपयांचा निधी

राज्यातील पशुधनाचा लम्पीच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई म्हणून पशुपालकास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीमधून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT