Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सांगलीत लसीकरणानंतरही वाढतोय लम्पी स्कीनचा संसर्ग

जिल्ह्यात दोन हजार जनावरांना लागण ः १६१ जनावरे दगावली

Team Agrowon

सांगली ः जिल्ह्यात लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने गो वर्गीय जनावरांच्या लसीकरणास (Vaccination) प्रारंभ केला. जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ४४१ गो वर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. जनावरांचे शंभर टक्के लसीकरण झाले असले तरी लम्पी स्कीनचा संसर्ग वाढत आहे. यामुळे पशुपालांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून गो वर्गीय जनावरांना लम्पी स्कीनची लागण होत आहे. जिल्ह्यात २ हजार ३२४ जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. वाळवा तालुक्यातून या आजाराचा संसर्ग सुरू झाला. हळूहळू तो जिल्हाभर पसरला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनावरांना लम्पी स्कीनचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे. प्रादुर्भाव सुरू होताच प्रशासनाने जनावरांच्या आठवडे बाजारांवर तसेच पर जिल्ह्यातून येणाऱ्या जनावरांवर बंदी घातली, असे प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले. त्यासोबतच बाधित जनावरांपासून पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांचे लसीकरण सुरू केले. त्यानंतर लसीकरण वाढवून सर्व गो वर्गीय जनावरांचे लसीकरण करून घेतले. लम्पी स्कीनचा संसर्ग रोखण्यासाठी असे सर्व प्रयत्न सुरू असले तरी त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात रोज सुमारे शंभरहून अधिक जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव होत आहे.

दरम्यान, ऊस तोडीसाठी टोळ्या दाखल होणार असल्याने लसीकरण झालेल्या जनावरांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे साखर कारखान्यांनी त्याबाबत काळजी घेतली आहे. लसीकरण झाल्यानंतरही जनावरांमध्ये संसर्ग होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात गाय आणि बैल वर्गातील जनावरांची एकूण संख्या तीन लाख ३७ हजार ४४१ आहे. या सर्वांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यातूनही जनावरांना लम्पी स्कीनची लागण होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT