Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीन’वरील औषधोपचार, लसीकरणाचा खर्च शासन करणार

लम्पी स्कीन आजारावरील औषधोपचाराचा आणि लसीकरणाचा सर्व खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येत असून, पशुपालकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन महसूल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : लम्पी स्कीन आजारावरील औषधोपचाराचा (Lumpy Skin Treatment) आणि लसीकरणाचा (Lumpy Vaccination) सर्व खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येत असून, पशुपालकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन महसूल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी केले.

ज्या शेतकऱ्यांनी लम्पी स्कीन आजारावरील उपचारासाठी आपल्या पशुधनावर तातडीने उपचार करण्यासाठी स्वत: खासगी दवाखान्यातून औषधे खरेदी केली आहेत, अशा पशुपालकांनी औषध खरेदी केल्याबाबतची माहिती पुराव्यासह सादर केल्यास त्यासाठी आलेला खर्च त्यांना परत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. विखे-पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव, अतिग्रे या गावांना भेट देऊन लम्पी स्कीन आजारामुळे बाधित पशुधनाची पाहणी केली. त्यानंतर हातकणंगले तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, राजू आवळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी विजय पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. विखे-पाटील म्हणाले, की या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल. कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारावर ९३ टक्के लसीकरण झाले असून, प्रशासन व पशुवैद्यकीय विभागाने केलेले काम कौतुकास्पद आहे. यामध्ये गोकुळ, वारणासारख्या दूध संघांचेही सहकार्य लाभले आहे. लसीकरणाच्या कामास गती देऊन पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या.

पशुसंवर्धन विभागाकडील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जात असल्याचे सांगून या आजारावर उपचारासाठी राज्यात एक हजार खासगी पशुवैद्यकीयांची नियुक्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवा यासाठी घेण्यात आल्या असून, त्यांना फिल्डवर पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT