Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नगर जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव सुरूच

Lumpy Skin Vaccination : आधीच लसीकरण झाले असले तरीही गतवर्षीपेक्षा यंदा बाधित जनावरे होण्याचा वेग अधिक आहे. त्यातही विशेष म्हणजे यंदा बाधित जनावरांत वासरांची संख्या अधिक आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात जनावरांना ‘लम्पी स्कीन’ची बाधा वाढतीच आहे. गेल्या सहा महिन्यात ६८३५ जनावरांना लागण झाली. आज जिल्ह्यात ७८० जनावेर बाधित आहेत. सहा महिन्यांत ३४८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

आधीच लसीकरण झाले असले तरीही गतवर्षीपेक्षा यंदा बाधित जनावरे होण्याचा वेग अधिक आहे. त्यातही विशेष म्हणजे यंदा बाधित जनावरांत वासरांची संख्या अधिक आहे.

नगर जिल्ह्यात दोन वर्षांपासून जनावरांना लम्पी स्कीनची बाधा होत आहे. गेल्या वर्षी चार हजारांपेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी जनावरांना झालेली बाधा पाहता यंदा लम्पी स्कीनचे लसीकरण वेगात सुरू केले. मात्र तरीही यंदा जनावरे बाधित होण्याचा वेग अधिक आहे.

यंदा आतापर्यंत नगर जिल्ह्यात १४ लाख १४ हजार जनावरांना लसीकरण केले आहे. जूनपासून जनावरे बाधित होत आहेत. आतापर्यंत सहा महिन्यात ६ हजार ८४५ जनावरे बाधित झाली. त्यातील ५ हजार ७१७ जनावरे आजारातून बरी झाली, तर ३४८ जनावरांचा मृत्यू झाला. सध्या चौदा तालुक्यातील ७८० जनावरे सक्रिय बाधित आहेत.

यंदा सर्वाधिक बाधित जनावरे राहुरी, राहाता, श्रीगोंदा तालुक्यात आहेत. जनावरे, चारा वाहतूक, बाजार, प्रदर्शने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. तरीही अनेक ठिकाणी बाजार, वाहतूक सुरूच आहे. लम्पीमुळे बाधित होणाऱ्या जनावरांचा दूध उत्पादनावरही परिणाम दिसून येत आहे. याशिवाय खरेदी-विक्रीतूनही आर्थिक फटका सोसावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

यंदाची एकूण बाधित जनावरे

(कंसात सध्याचे सक्रिय जनावरे)

अकोले २४८ (१५)

जामखेड ११३ (११)

कर्जत ९७ (२९)

कोपरगाव ५३२ (६२)

नगर ४१० (६८)

नेवासा ६६५ (४५)

पारनेर २१५ (४७)

पाथर्डी ८६५ (५७)

राहाता ३४० (९९)

राहुरी ८४४ (१३४)

संगमनेर ९३ (११)

श्रीगोंदा ७२७ (७२)

श्रीरामपूर २१३ (६३)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India-UK Trade Deal: भारत-इंग्लंड कराराचा शेतकऱ्यांना फायदा नाही

Agriculture Irrigation Scheme: धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासन गुंडाळणार

Turmeric Price: हळदीचे दर दबावात

Pomegranate Crop Loss: डाळिंब बागायतदारांवर कोसळले अस्मानी संकट

Maharashtra Rain: विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT