Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराबाबत जालन्यात नियंत्रित क्षेत्र घोषित

गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी याची ज्या ठिकाणी ते पाळले, ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई या नियंत्रणानुसार बंदी घालण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

जालना : जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) हा आजार जलद गतीने पसरणारा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून लम्पी आजाराबाबतीत (Lumpy Skin Jalna News) जालना जिल्हा सोमवारी (ता. १२) नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

या नियंत्रित क्षेत्राच्या घोषणेमुळे लम्पी आजारावर एलएसडी नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मूलन करता येणे शक्य होईल. गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी याची ज्या ठिकाणी ते पाळले, ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई या नियंत्रणानुसार बंदी घालण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजाती प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण प्राण्यांच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्याचे शव कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई घातली गेली आहे.

गोजातीय प्रजातींच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई केली आहे.

नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यालाही मनाई करण्यात आली आहे. जनावरांच्या खरेदी विक्री साठीचे जालना जिल्ह्यातील सर्व बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : पावसाची तूट, पेरणीला फटका; कापूस आणि सोयाबीन लागवड पिछाडीवर

Goat Farming: शेळीपालनातून मिळविले आर्थिक स्थैर्य

Farmer Success Story: गावरान लसूण उत्पादनातून मिळविली वेगळी ओळख

Environmental Conservation: वृत्तांत उप्पुगल गाव भेटीचा!

MGNREGA: ‘राम’भरोशावर रोजगार!

SCROLL FOR NEXT