Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्‍किननंतर पशुधनाला लाळ्या खुरकूतचा धोका

राज्यात ऊस तोडणी हंगाम सुरू झाला असून, विविध भागांतून बैलांसह त्यांच्याबरोबर इतर पशुधनाची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली आहे.

Team Agrowon

पुणे ः राज्यात ऊस (SugarCane) तोडणी हंगाम सुरू झाला असून, विविध भागांतून बैलांसह त्यांच्याबरोबर इतर पशुधनाची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली आहे. तर, काही ठिकाणी लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव जाणवू लागला असून, पुणे जिल्ह्यातील बोरी आणि आळे (ता.जुन्नर) येथे लाळ्या खुरकूत बाधित पशुधन आढळून आले आहे.

सटाणा (जि. नाशिक) येथून आलेल्या बैलामुळे लाळ्या खुरकूतची लागण झाल्याचे निदान पशुसंवर्धन विभागाला झाले असून, परिसरातील पशुधनाचे तातडीने लाळ्या खुरकूतचे लसीकरण हाती घेण्यात आले आहे. यासाठी तातडीने १२ हजार लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जुन्नर येथील बोरी आणि आळे परिसरात सटाणा (जि.नाशिक) येथून ऊस तोडणी कामगार दाखल झाले आहेत. या परिसरात गेल्या आठवड्यात लाळ्या खुरकूत सदृश आजाराने बैल आजारी आढळले. त्यांचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवले असता, ते पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे या परिसरातील पशुधनाचे तातडीने लसीकरण हाती घेण्यात आले आहे. यासाठी १२ हजार लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी सांगितले.

लसीकरणासाठी सांगली जिल्ह्यातून १२ हजार लसमात्रा मागविण्यात आल्या असून, बाधित गावातील बोरी, आळे, बेल्हे राजुरी या गावांबरोबरच परिसरातील गावांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात आल्याचे डॉ. विधाटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Rice: जीएम भात वाणांमुळे पारंपरिक वाणांना धोका? सर्वोच्च न्यायालयात याचिका

Land Survey Protest : मोजण्या थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन

Koradi Power Plant : ‘कोराडी’तून सिंचनासाठी पाणी देण्याची चाचपणी

Sugarcane FRP Updates : 'बळीराजा'कडून आजपासून उसाचा अंतिम हप्ता वितरण

Livestock Care: दुष्काळ परिस्थितीत पशुधनाची काळजी

SCROLL FOR NEXT