Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या प्रतिबंधासाठी जनावरांची वाहतूक थांबवावी

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाय वर्गातील जनावरांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे. रोपळे व परिसरातील जनावरांमध्ये अद्यापही लम्पी स्कीनचा शिरकाव झाला नाही.

टीम ॲग्रोवन

रोपळे बुद्रूक : रोपळे (ता. पंढरपूर) येथील गाय वर्गातील जनावरांना लम्पी स्कीन आजार (Lumpy Skin Disease) प्रतिबंधक लस (Lumpy Vaccination) देण्यास सुरवात झाली. दरम्यान, लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाय वर्गातील जनावरांची वाहतूक (Livestock Transportation) पूर्णपणे थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

रोपळे व परिसरातील जनावरांमध्ये अद्यापही लम्पी स्कीनचा शिरकाव झाला नाही. ही जमेची बाब असली तरी या आजाराचा फैलाव होऊ नये, म्हणून पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे डास, माश्या व गोचडांपासून संरक्षण करण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. उमाकांत बोर्डे यांनी केले आहे.

रोपळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लम्पी प्रतिबंधक गोट पॉक्स वॅक्सीन ही लस गाय वर्गातील लहान-मोठ्या जनावरांना मोफत देण्यास सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात या लसीच्या सुमारे ५०० डोस मात्रा आल्या आहेत. यातील सुमारे ३०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लम्पी रोगाचा संसर्ग हा गाय वर्गातील जनावरांनाच जास्त होतो. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लम्पी रोगापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. शिवाय या दुसऱ्या भागातून जनावरे आणू नयेत.

- डॉ. उमाकांत बोर्डे, पशुधन विकास अधिकारी, रोपळे बुद्रूक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT