Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease: नऊ तालुक्यांत जनावरांचे आठवडी बाजार बंद

‘लम्पी स्किन’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा राज्यात फैलाव होऊ नये म्हणून नगर जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. साधारण महिनाभर हे बाजार बंद राहणार असल्याचे दिसते.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) वाढत आहे. ज्या भागात बाधित जनावरे आढळत आहेत, त्या परिसरातील दहा किलोमीटरच्या परिसरातील जनावरांचे आठवडी बाजार (Livestock Market) बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत सुमारे नऊ तालुक्यांतील ५० च्या वर छोटे-मोठे जनावरांचे आठवडी बाजार बंद केले आहेत.

नगर जिल्ह्यातील जनावरांच्या नावाजलेल्या आठवडी बाजारात राज्यभरातून जनावरे येतात. येथून जनावरे खरेदीही केली जातात. ‘लम्पी स्किन’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा राज्यात फैलाव होऊ नये म्हणून नगर जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. साधारण महिनाभर हे बाजार बंद राहणार असल्याचे दिसते.

लोणी (ता. राहाता), काष्टी (ता. श्रीगोंदा), घोडेगाव (ता. नेवासा) यासह साधारण आठ ते दहा ठिकाणी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी आठवडी बाजार भरतात. जिल्ह्यात यंदाही जनावरांना ‘लम्पी स्कीन’च्या आजाराचा फैलाव होऊ लागला आहे. आतापर्यंत सुमारे ७० जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. पशुसंवर्धन विभागाकडे ५२ हजार लसी उपलब्ध आहेत. आतापर्यंत ३७ हजार जनावरांना लसीकरण झाले आहे. साधारण ६१ हजार जनावरांना लसीकरण करण्याचे सध्या नियोजन आहे.

‘‘प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या हद्दीतील पाच किलोमीटर परिसरात लसीकरण सुरु आहे. बाधित सर्व जनावरे बैलवर्गीय आहेत. म्हैसवर्गीय जनावरांनाही प्रादुर्भाव होऊ शकतो. अजूनतरी एकाही म्हशीला प्रादुर्भाव झालेला नाही. शेळ्या-मेंढ्यांना या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही,’’ असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले.

‘लम्पी स्कीन’ हा विषाणुजन्य आजार आहे. इतर जिल्ह्यांतून जनावरे येऊन बाधित जनावरांत भर पडेल. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजार बंद केले. राहुरीचा बाजार बंद केला होता. मात्र बुधवारी काही व्यापाऱ्यांनी बाजार भरवला. त्याची दखल घेऊन पोलिसांनी बाजार बंद करून गुन्हा दाखल केला आहे.

आतापर्यंतची तालुकानिहाय बाधित जनावरे

अकोले ः १५, श्रीरामपूर ः ४, नेवासा ः ४, राहुरी ः १८, कर्जत ः ४, संगमनेर ः ११, पारनेर ः ५, श्रीगोंदा ः २, पाथर्डी ः १

‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव लक्षात घेता तो टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. नगर जिल्ह्यात लसीकरणही वेगात सुरु आहे. प्रादुर्भावग्रस्त आणि इतर जनावरांबाबत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त, नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT