Kharif Jowar Fodder Plantation
Kharif Jowar Fodder Plantation Agrowon
काळजी पशुधनाची

Kharip Jawar : खरीप ज्वारीची पेरणी कधी करावी?

Team Agrowon

अन्नधान्य म्हणून ज्वारीची (Sorghum) लागवड करताना, त्यापासून हिरवा चारा (Green Fodder) मिळत नाही. हिरव्या चाऱ्यासाठी कडवळ म्हणून ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारीची लागवड खरीप (kharif) आणि रब्बी (Rabbi) दोन्ही हंगामात करता येते. रब्बीमधील पेरणीचे क्षेत्र जास्त असले तर खरीपातील उत्पादन जास्त आहे.

ज्वारीसाठी उष्ण व कोरडे हवामान पोषक असते. मात्र चारा पिक म्हणून तिन्ही हंगामात ज्वारीचे उत्पादन घेता येते. ज्वारीमध्ये प्रथिनांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यापर्यंत असते. ज्वारीची पेरणी योग्य वेळी करून तसेच सुधारित वाणांचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. चिकट, पोयट्याची जमीन ज्वारीच्या पिकासाठी योग्य आहे. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ असलेल्या जमिनीत ज्वारीची वाढ चांगली होते. चांगली निचरा होणारी काळी कसदार जमीन उपयुक्त असते.

पेरणी करताना ज्वारीच्या प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जीवाणु संवर्धकाची प्रक्रिया करावी. अॅझोटोबॅक्टरमुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन पिकाला नत्राची उपलब्धता होते. जमिनीची वाफसा अवस्था निर्माण झाल्यानंतर पेरणी शक्यतो जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी. पाण्याची सोय असल्यास पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यातच करावी.

जमिनीची एक खोल नांगरणी करून घ्यावी. त्यानंतर २ ते ३ वखरणी करून घ्याव्यात. दोन ओळीतील अंतर २५ ते ३० सेंटीमीटर ठेवावे. पेरणी करताना ५ ते ७ सेंटीमीटर खोलीवर करावी. हेक्टरी ४० किलो बियाण्याची गरज पडते. पेरणीनंतर पहिली विरळणी १० ते १२ दिवसांनी करावी. आणि त्यापुढील विरळणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी करावी.

फुले रुचिरा, फुले अमृता, फुले गोधन, एफ. आर. आय-१ आणि २ या वाणांची लागवड करावी.
कोवळ्या ज्वारीमध्ये धुरीन नावाचे रसायन असते. जनावरांच्या पोटात त्याचे रुपांतर हायड्रोसायनिक आम्लामध्ये होत असते. हायड्रोसायनिक आम्लामुळे जनावरांचे पोट फुगते. त्यामुळे ज्वारीची चाऱ्यासाठी कापणी पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी पिक फुलोऱ्यात येत असते, तेव्हा पहिली करावी. एक हेक्टर क्षेत्रातून ५०० ते ५५० क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT