Vitamin-B Deficiency Agrowon
काळजी पशुधनाची

या जीवनसत्त्वाची कमतरता शेळ्यांमध्ये जास्त !

जीवनसत्त्व ब हे कर्बोद्कांच्या चयापचय क्रियेत गरजेचं असते. यासोबतच चेतासंस्थेचे कार्य सुरळीत राहण्यासाठीही गरजेचं आहे.

Roshani Gole

जनावरांच्या निरोगी वाढीसाठी जीवनसत्त्वे (vitamins) कमी प्रमाणात का होईना पण गरजेची असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता झाल्याने शारीरिक संतुलन बिघडते. काही जीवनसत्त्वे ही पाण्यात विरघळणारी असल्याने पाण्यावाटे शरीराबाहेर टाकली जातात. त्यामुळे अशा जीवनसत्त्वाचा आहारातून समावेश करणे गरजेचे असते.

जीवनसत्त्व ब हे कर्बोदकांच्या चयापचय (metabolic activity) क्रियेत गरजेचं असते. यासोबतच चेतासंस्थेचे कार्य सुरळीत राहण्यासाठीही गरजेचं आहे. जीवनसत्त्व ब च्या कमतरतेमुळे मेंदूला उर्जेचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. मेंदूच्या कार्यात अडथळा आल्याने जनावरांमध्ये फिट आल्यासारखे प्रकार दिसून येतात.

कारणे-

जनावरांच्या पोटाचे चार कप्पे असल्याने कोठीपोटातील जीवाणू जीवनसत्त्व ब नैसर्गिकरीत्या तयार करत असतात. कोटीपोटातील जिवाणूंचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी कोठीसामू संतुलित ठेवणे गरजेचं असते.

जनावरांनी जास्त प्रमाणात हिरवा चारा किंवा शिजलेले अन्न खाल्यास पोटाचा सामू आम्लधर्मी होत असतो. आम्लधर्मी सामूमध्ये थायमिनची निर्मिती कमी प्रमाणात होत असते. थायमीनचे प्रमाण कमी झाल्याने थायमिनेज संप्रेरकाचे शरीरातील प्रमाण वाढते.
जनावरांनी जास्त प्रमाणत हिरवे, कोवळे लुसलुशीत गवत खाल्ल्यानेही पोटाचा सामू बिघडत असतो. थायमिनची (thiamine) कमतरता शेळ्या-मेंढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.

लक्षणे-
पोटाचा सामू बदलल्याने जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते.
दात करकर वाजवू लागतात.
शेळयांमध्ये मेंदूच्या पेशीची कार्यक्षमता कमी झाल्याने त्यांना फिट आल्यासारखे झटके येतात.
शेळ्या मान पाठीमागे वळवून तोंड वर करतात.
पायांच्या स्नायूंचा थरकाप होऊ लागतो.
शेळी एका बाजूला पाडून ठेवली तर ती दुसर्‍या बाजूवर स्वताहून पलटी मारते या लक्षणावरून थायमीन कमतरतेचे निश्चित रोग निदान
करता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity Mission: देर आए, दुरुस्त आए

Land Allotment Inquiry: टेमघर जमीनवाटपाची चौकशी करा; उच्च न्यायालयाचे आदेश

Shetkari Mitra Recruitment: ‘शेतकरी मित्र भरतीत कृषी पदवीधरांना प्राधान्य’: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Turmeric Agri Cluster: उमरखेडमधील ‘हळद प्रक्रिया क्लस्टर’ रखडले

Land Surveyors Appointed: पुणे जिल्ह्यात खासगी ४० भूमापक नेमणार

SCROLL FOR NEXT