animal disease Agrowon
काळजी पशुधनाची

जनावरांच्या नाकातून चिकट स्त्राव येत असल्यास ‘या’ आजाराची बाधा

जनावरे पीत असलेल्या पाण्याच्या स्त्रोतात गोगलगायींचा प्रादुर्भाव असल्यास, जनावरांना नाकाडी आजाराची बाधा होण्याची शक्यता असते. याबद्दलच्या

Roshani Gole

उन्हाळ्यात चाऱ्याबरोबर काही ठिकाणी पाण्याचीही कमतरता (water scarcity) जाणवू लागते. बरेचदा जनावरांना चरायला सोडल्यानंतर नजरेस पडणाऱ्या कोणत्याही डबक्यातील पाणी ते पीत असतात. अशा डबक्यात गोगलगायींचा (snails) प्रादुर्भाव झालेला असल्यास जनावरांना नाकाडी (nakadi) नावाचा आजार होतो.

नाकाडी हा आजार गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांसारख्या सर्वच जनावरांमध्ये आढळून येतो. नाकाडी आजार सिस्टोसोमा नावाच्या पर्णकृमी परजीवीमुळे होतो. परजीवी हे जनावरांच्या शरीरावर बसून रक्ताचे शोषण करीत असतात. मात्र हा परजीवी जनावरांच्या नाकातील मेझेट्रिक नावाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आढळून येतो. या आजाराची बाधा प्रामुख्याने जनावरे पीत असलेल्या पाण्याच्या स्त्रोतात गोगलगायींचा प्रादुर्भाव असल्यास होते.

या आजारात जनावरांना श्वास घेण्यास घेण्यास त्रास होतो. जनावरे श्वास घेताना घर-घर असा आवाज येतो. या रोगाची लागण प्रामुख्याने जनावरे सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास गेल्यावर होत असते. हा आजार ओळखण्यास अत्यंत सोपा असा आहे. यात प्रामुख्याने नाकातून येणारा घुरघुरणारा आवाज हे मुख्य लक्षण आहे. या सोबतच नाकातून सतत शेंबूड गळतो आणि चिकट स्त्राव बाहेर येत असतो. जनावरांच्या नाकाच्या आतील भागाचे निरीक्षण केल्यास फुलकोबीच्या आकारासारखी वाढ झालेली दिसून येते.

या आजाराचे निदान करण्यासाठी फुलकोबीच्या आकाराचा नाकाच्या आतील भाग चिमट्याच्या सहाय्याने रगडून घ्यावा. रगडल्यानंतर बाहेर येणारा चिकट स्त्राव काचपट्टीवर घेऊन ४ % ग्लिसिरीन टाकून, सुक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करावे. निरीक्षण केल्यानंतर त्यात सिस्टोसोमाची अंडी दिसून येतात. या रोगावर अॅथीओमॅलीन थायोमेलेट नावाचे ओषध पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तीन वेळा टोचून घ्यावे. लक्षणे गंभीर असल्यास पुढील उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावेत.

यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः जनावरांचे पाणवठे असलेल्या जागी गोगलगायी असल्यास त्यांचा नायनाट करावा. आजारी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. पाण्याचा हौदाला महिन्यातून दोन वेळा किंवा आठवड्यातून एकदा चुना मारून घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: देशात आर्थिक संकटाचं वादळ येतंय, शेतकऱ्यांना झळ बसणार, राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

Farmer Protest: जामसंडेत आंबा-काजू बागायतदारांचे आंदोलन

Agricultural Awareness Program: सोनवळा येथे विज्ञानाधारित निविष्ठा जागरूकता कार्यक्रम

Wedding Book Gifting: फेट्यांच्या मानपानाऐवजी पुस्तकरूपी भेट

Nutrient Management: शास्त्रोक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन काळाची गरज : तांबडे

SCROLL FOR NEXT