Milk Production Agrowon
काळजी पशुधनाची

Milk Production : उन्हाळ्यातही कशी झाली दुग्धोत्पादनात वाढ?

दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये जानेवारी महिन्यात मका-ज्वारी इत्यादी हिरवा पाला देणाऱ्या पिकांची पेरणी केली होती.

Team Agrowon

Mangao News : दूध उत्पादन (Milk Production) करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये जानेवारी महिन्यात मका-ज्वारी इत्यादी हिरवा पाला देणाऱ्या पिकांची पेरणी केली होती. उन्हाळ्यात ही पिके बहरली असून, या हिरव्या चाऱ्याचा उपयोग दूध देणाऱ्या जनावरांना खाद्य म्हणून केला जात आहे.

त्‍यामुळे ऐन उन्हाळ्यातही दुधाच्या उत्पादनात घट झाली नसून, चांगले दुग्धोत्पादन होत आहे. यामुळे शेतकरी सुखावले आहेत.

उन्हाळ्यात दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना गुरांच्या हिरव्या चाऱ्याची चिंता सतावेत असते. ऐन उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने दूध उत्पादनात लक्षणीय घट होते. दुग्ध उत्पादनात होणारी घट भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. उन्हाळ्यात सुका पेंढा व इतर खाद्यान्न उपलब्ध होते.

मात्र, यामुळे दूध उत्पादनात वाढ होत नाही. या दुधाची घट भरून काढण्यासाठी तालुक्यातील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात मका-ज्वारीची पेरणी केली होती.

ऐन उन्हाळ्यात ही पिके बहरली असल्याने गुरांना हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. या चाऱ्याचा उपयोग दूध देणाऱ्या जनावरांना खाद्य म्हणून केला जात असल्याने चांगले दुग्धोत्पादन होत आहे. यामुळे शेतकरी सुखावले आहेत. स्वतःच्या किंवा भाड्याने घेतलेल्या शेतीमध्ये उन्हाळी दिवसात मका, ज्वारीचे पीक फक्त गुरांना खाद्य म्हणून घेतले जात आहे.

काही एकर जागेवर शेतकऱ्यांनी मका, ज्वारीचे पीक घेतले असून, या हिरव्या चाऱ्याचा उपयोग दूध उत्पादन वाढीसाठी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

उन्हाळ्यात गुरांना हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घटते. यावर उपाय म्हणून मका, ज्वारीच्या पिकांची गुरांना चारा म्हणून लागवड केली आहे. उन्हाळी दिवसात या पिकांचा हिरवा पाला म्हणून उपयोगात आला आहे. यामुळे दूध उत्पादन चांगले होत आहे.
सिद्धेश पालकर, दुग्धोत्पादक, माणगाव
मका, ज्वारीच्या लागवडीतून उन्हाळ्यात दूध देणाऱ्या गुरांना हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादनात चांगली वाढ होत आहे.
योगेश खडतर, दुग्धोत्पादक, माणगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Wildlife: राज्यात दोन नवीन अभयारण्ये; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय

Drought Agriculture Guide : दुष्काळ, कमी पाण्याची पिके, चारा निर्मितीवर मार्गदर्शन

Bogami Nala Bridge : एकजुटीची ताकद! बोगामी नाल्यावर ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला पूल

Girad Sitaphal Market : दुष्काळाची मोठी झळ! प्रसिद्ध गिरडच्या सीताफळाची गोडी महागली, आवक घटल्याने भाव कडाडले

Cotton Crop Crisis : शेतकरी हवालदील! सरासरी चारच बोंडे; यंदा कापसाला नुसता पालाच पाला!

SCROLL FOR NEXT