Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

दुधाळ गायी- म्हशींमध्ये वारंवार उलटण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.

Team Agrowon

गायी, (Cow) म्हशींमध्ये तीनदा योग्य वेळी रेतन केल्यानंतरही जर जनावर गाभण राहत नसेल, तर यास वारंवार उलटणे असे म्हणतात. गायी म्हशीमध्ये माजाचे चक्र दर २१ दिवसांनी येत असते. जिथे जास्त दूध उत्पादन, तिथे वारंवार उलटण्याचे प्रमाण जास्त दिसून आलेले आहे. त्यामुळे दुधाळ गायी- म्हशींमध्ये वारंवार उलटण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.

वारंवार उलटण्याची अनेक कारणे आहेत परंतु फलनातील दोष आणि भ्रूण दोष ही मुख्य कारणे आहेत. रेतन केल्यानंतर फलनाची क्रिया योग्य झालेली असल्यास, २१ दिवसांनी पुन्हा माज दिसून येत नाही. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने (NDDB) जनावर गाभण नराहण्याच्या समस्येवर नैसर्गिक घरगुती उपचारांची शिफारस केली आहे.

खाली दिलेले पदार्थ क्रमवार दिवसातून एकदा गुळ आणि मिठासोबत खाऊ घालावे.

- एक मुळा दररोज पाच दिवस

- कोरफडीचे एक पान दररोज असे चार दिवस

- चार मुळी हडजोड चार दिवस

- चार मुठी कडीपत्ता व हळद चार दिवस

लक्षात ठेवा हा उपचार माजाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासून करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT