Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Foot Rot Disease : जनावरांना फूट रॉट आजाराची साथ

Animal Health : ऐन शेती हंगामात संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी गावात जनावरांमध्ये फूट रॉट आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : ऐन शेती हंगामात संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी गावात जनावरांमध्ये फूट रॉट आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. आजारामुळे एक करडू आणि दोन रेडकांचा मृत्यू झाला आहे.

आजाराचा प्रसार लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातर्फे गावातील जनावरांची तपासणी करण्यात आली आहे. बुरंबी गावातील गोपाळवाडी भागात सहा म्हशी, रेडे आणि पाच शेळ्या फूट रॉट आजाराने बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात फूट रॉटचा प्रादुर्भाव बुरंबी गावात दिसून आल्याचे पशूसंवर्धन विभागातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. बुरंबी, गोपाळवाडी परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे आजारी पडल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक होते.

मात्र या गाव परिसरात पशुवैद्यकीय दवाखाना तसेच वैद्यकीय अधिकारी, परिचर नसल्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांवर उपचार करणे अशक्य झाले आहे. तापाने मलूल पडलेल्या जनावरांची परिस्थिती पाहून शेतकरी हतबल झाले. उपचाराअभावी अनिल गजबर यांची दोन जनावरे डोळ्यांसमोरच दगावली. एका शेतकऱ्याची शेळी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यमुखी पडली.

पशू उपचाराबाबत संगमेश्वर येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज शेट्ये म्हणाले, की आजाराच्या प्रसाराबाबत माहिती मिळताच पशूवैद्यकीय विभागातील पथक गोपाळवाडी येथे रवाना झाले. त्यांनी अनिल गजबार यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या जनावरांना फूट रॉट आजाराचा संसर्ग झाला आहे.

बाधित जनावरांवर उपचार सुरू केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बुरंबी, गोपाळवाडी परिसरात फूट रॉट आजाराच्या संसर्गाची प्रथमच नोंद झाली आहे. सातत्याने चिखलात चालल्यामुळे जनावरांच्या पायाच्या नसाना दुखापत झाली आहे.

या आजारात जनावरांना ताप येतो. गोपाळवाडीतील शेतकऱ्याने परजिल्ह्यातून एक गाय विकत आणली होती. ही गाय व्यायली आणि वासरू झाले होते. ते या आजाराच्या संसर्गामुळे दगावले आहे. गाय आजारातून बरी झाली आहे. गावातील बाधित जनावरांची तपासणी करून उपचार सुरू केले आहेत. ही जनावरे लवकर बरी होतील. मात्र परिसरातील गावातून फूट रॉट आजाराने जनावरे बाधित झाल्याची नोंद नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT