Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेळ्या-मेंढ्यांमधील फूटरॉट

फूटरॉट (पाय कुजणे) हा शेळ्या-मेंढ्यामधील एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. आजारामुळे खुरांच्या उतींवर परिणाम होतो. ज्यामुळे पाय कुजतात.

टीम ॲग्रोवन

डॉ. एम. एस. बुधे, डॉ. यू. एम. तुमलाम

फूटरॉट (Goat Foot Rot Disease) (पाय कुजणे) हा शेळ्या-मेंढ्यामधील (Goat Sheep Disease) एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. आजारामुळे खुरांच्या उतींवर परिणाम होतो. ज्यामुळे पाय कुजतात. शेळ्यांच्या तुलनेत हा आजार मेंढ्यामध्ये जास्त प्रमाणात होतो. या आजारामध्ये कळपाचे उत्पादन कमी होते, जनावरांचा अकाली मृत्यू होतो, वजन कमी होते, उत्पादन दर कमी होतो. आजारामुळे असह्य वेदना होतात. अस्वस्थता आणि लंगडेपणा येतो. जास्त चराई करू शकत नाहीत.

१) सांसर्गिक फूटरॉट प्रामुख्याने संक्रमित जनावरांद्वारे पसरतो. आजारास कारणीभूत जिवाणू संक्रमित जनावरांपासून मातीत संक्रमित नसलेल्या जनावरांपर्यंत जातो. हे जिवाणू जमिनीत १ ते १० महिने आणि खुरांच्या उतींमध्येही जास्त काळ टिकू शकतात.

लक्षणे :

१) लंगडेपणा, कमी वजन वाढणे, दूध आणि लोकर उत्पादनात घट आणि पुनरुत्पादन क्षमता कमी होते.

२) खुरांच्या दरम्यान त्वचेचा ओलसरपणा दिसतो. जो पुढे वेदनादायक बनतो.

३) साधारणपणे प्राणी गुडघ्यावर चरताना दिसतात.

४) पाय लाल होतात. पायाच्या खुरांमधील त्वचा घट्ट आणि दुर्गंधीयुक्त होते.

५) लवकर उपचार न केल्यास, जिवाणू विषारी द्रव्ये सोडतात. ज्यामुळे खुराची भिंत आणि पायाचा तळ कमकुवत होतो, परिणामी खुराची भिंत सैल होते आणि पायापासून वेगळी होते.

६) आजाराच्या पहिल्या अवस्थेत अतिवृद्ध, तडे गेलेले किंवा खराब झालेले खूर यांचा समावेश होतो.

७) विशिष्ट खनिजांच्या कमतरतेच्या आहारामुळे खुराचे आरोग्य खराब होते आणि दुय्यम संक्रमण होण्याची शक्यता असते.

प्रतिबंध आणि नियंत्रण :

१) प्रतिजैविकांचा पद्धतशीर उपचार सर्वात प्रभावी आहे. जिवाणूंच्या वाढीसाठी कारणीभूत ठरणारी अतिरिक्त उती काढून टाकण्यासाठी नखे छाटावीत.

२) जंतुनाशक एकत्रितपणे प्रतिजैविकांसह वापरून फूटरॉटचे व्यवस्थापन करता येते.

३) आजारी जनावरांची खरेदी करू नये.

४) कळपात समाविष्ट करावयाच्या कोणत्याही मेंढ्यांना फूटरॉट आणि इतर जुनाट आजारांचा प्रसार रोखण्यासाठी अनेक आठवडे विलगीकरण करणे आवश्यक आहे.

५) जनावरे वाहतुकीची वाहनांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण महत्त्वाचे आहे.

६) संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी १५ मिनिटांपर्यंत १० टक्के झिंक सल्फेटचे द्रावण करून मेंढ्यांना त्यांच्यामधून चालण्यास आणि उभे राहण्यास भाग पाडावे. दर ५ ते ७ दिवसांनी उपचार करावेत. यामुळे फूटरॉट संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.

७) लंगड्या मेंढ्यांना उपचारासाठी वेगळे करावे.

८) शक्य असल्यास बाधित जनावरे बरी होईपर्यंत कोरड्या भागात ठेवावीत. जर तीन दिवस ते चार दिवसांत सुधारणा दिसून आली नाही, तर याचा अर्थ असा होतो की संसर्ग वाढला आहे.

संपर्क ः

डॉ. एम. एस. बुधे, ९९२२६१५२५८

डॉ. यू. एम. तुमलाम, ९४२२१७७६७२

(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT