Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : उंडवडी सुपेसह पाच गावे ‘लम्पी स्कीन’ मुक्त

येथील पशुसंवर्धन दवाखान्यांतर्गत सहा गावांत जनावरांचा लम्पी स्कीन हा आजार रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे.

टीम ॲग्रोवन

उंडवडी सुपे, ता. बारामती ः येथील पशुसंवर्धन दवाखान्यांतर्गत सहा गावांत जनावरांचा लम्पी स्कीन (Lumpy Skin) हा आजार रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला (Animal Husbandry) यश आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या महिनाभरात परिसरातील उंडवडी सुपे, जराडवाडी, खराडेवाडी उंडवडी कडेपठार या चार गावांत सहा जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लम्पी स्कीनचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उंडवडी सुपे, उंडवडी कप, सोनवडी सुपे, जराडवाडी, कारखेल, खराडेवाडी या सहा गावांत जनावरांना मोफत ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.

सहा गावांतील ६ हजार ५०० जनावरांपैकी ६ हजार १०० जनावरांना सरकारी लस, तर २०० जनावरांना खासगी, तसेच ३०० जनावरांना बारामती दूध संघाच्या वतीने लस देण्यात आली होती. लम्पी स्कीन झालेल्या जनावरांना योग्य व वेळेत उपचार मिळाल्याने एकही जनावर दगावले नाही.

तसेच परिसरात युद्ध पातळीवर लसीकरण झाल्याने लम्पी आजाराचा फैलाव रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे. लम्पी लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी पशुधन विस्तार अधिकारी डॉ. आर. आर. पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

त्यामुळे वेळेत लसीकरण मोहीम यशस्वी झाल्याची माहिती उंडवडी सुपेचे पशुधन पर्यवेक्षक पी. बी. होळकर व परिचालक महेश गायकवाड यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT