Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Buffalo Market : म्हशींचा बाजार भरवण्यास अखेर परवानगी

राज्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार बंद करण्यात आले होते.

Team Agrowon

सोलापूर : राज्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार बंद (Livestock Market) करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यामध्ये गोवंशीय पशुधनास लम्पीचे प्रतिबंधात्मक लसीकरण (Animal Vaccination) पूर्ण झाल्याने, लागू केलेले निर्बंध अंशतः शिथिल करण्यात आले असून, सध्या केवळ म्हशींचा बाजार भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये गोवंशीय प्राण्यांचे (गाय, बैल व वासरे) बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. म्हैस प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे व बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास परवानगी देण्यात येत असून, वाहतूक अधिनियम २००१ मधील प्राण्यांची वाहतूक नियमांचे पालन करून, तसेच जनावरांचा आरोग्य दाखला सोबत असणे बंधनकारक राहील. संबंधित ठिकाणी बाजारामध्ये जंतुनाशक फवारणी करणे बाजार समितीस अथवा आयोजकास बंधनकारक राहील.

तसेच जिल्ह्यामध्ये राज्यातील अमरावती व नाशिक महसुली विभागांतील कोणत्याही जिल्ह्यांमधून सोलापूर जिल्ह्यात गुरांची ने-आण करता येणार नाही. तसेच पुणे, औरंगाबाद, नागपूर या महसुली विभागांतून केवळ संक्रमित नसलेल्या आणि लसीकरण केलेल्या गुरांची सोलापूर जिल्ह्यामध्ये ने-आण व वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बैलगाडा शर्यतीला परिस्थितीनुसार परवानगी...

जिल्ह्यामध्ये यात्रेनिमित्त किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राण्यांचे प्रदर्शन भरविण्यास, बैलगाडा शर्यत आयोजन करण्यास कोणतीही परवानगी देण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले असून, लम्पीचा त्या भागातील प्रादुर्भाव व लागण असल्याचे प्रमाण विचारात घेऊन परिस्थितीनिहाय परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Money Lending Act: अवैध सावकारीला आळा घालू; सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची कायद्यात बदल करण्याची घोषणा

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

SCROLL FOR NEXT