Goat Farming  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेळीपालकांसाठी आधुनिकता आणि एकजुटीचा फॉर्म्युला

Goat Farmers : आदिवासी शेतकरी हे उत्तम पशुपालक असून त्यांनी समूह गटाच्या माध्यमातून, सांघिक प्रयत्नातून उपजीविकेसह उद्योजकतेची वाट शोधत आपली उन्नती साधावी.

Team Agrowon

Akola News : आदिवासी शेतकरी हे उत्तम पशुपालक असून त्यांनी समूह गटाच्या माध्यमातून, सांघिक प्रयत्नातून उपजीविकेसह उद्योजकतेची वाट शोधत आपली उन्नती साधावी. मेळघाटासारख्या दुर्गम भागातील शेळीपालकांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेळीपालन केल्यास आणि दूध व मांस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केल्यास त्यांचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.

तंत्रशुद्ध पशुपालनाबाबत आणि नवनवीन तंत्रज्ञानास प्रयोगशाळेतून पशुपालकांच्या दारात आणण्यास विद्यापीठ सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.

भारतीय कृषी अनुसंधान संस्था-राष्ट्रीय मांस अनुसंधान संस्थान (हैदराबाद) द्वारा पुरस्कृत आणि स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेद्वारे व पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने ‘शेतकरी शास्त्रज्ञ संवाद’ मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. पाटील बोलत होते.

संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावशे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. याप्रसंगी राष्ट्रीय मांस अनुसंधान संस्थेचे निदेशक डॉ. सुखदेव बारबुद्धे यांनी आदिवासी शेळीपालकांना शेळीच्या मांस उत्पादनातील व्यावसायिक संधींबाबत अवगत केले.

तर माफसूचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी फायदेशीर शेळीपालनात आरोग्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.वंजारी यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली, तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोळंके यांनी पशुपालकांनी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सूत्रसंचालन डॉ. प्रवीण बनकर यांनी केले. माफसू विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षात साजरा होणाऱ्या दूध जागृती अभियान, अंडी जागृती अभियान आणि डिजिटल शेती शाळेबाबत माहिती दिली. संवाद कार्यक्रमात डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. सुनील वाघमारे आणि डॉ. सुनील हजारे यांनीही मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Market: हळदीचे वायदे बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

Maharashtra Rain: राज्यात २३० मंडलांत अतिवृष्टी

Vidarbha Crop Loss: विदर्भात दोन लाख हेक्टरवर पीक नुकसान

Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT